महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आकडा वाढताच!; राज्यातील बाधितांची संख्या 200 पार - corona maharastra

आज महाराष्ट्रात एकूण 22 नवे रुग्ण सापडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण बाधित रुग्णांचा आकडा 203 इतका झाला आहे. राज्यातील नागरिकांसाठी ही चिंताजनक बाब आहे.

कोरोना
कोरोना

By

Published : Mar 29, 2020, 8:13 PM IST

Updated : Mar 29, 2020, 9:03 PM IST

मुंबई- राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा रोजच्या रोज वाढतच चालला आहे. आज महाराष्ट्रात एकूण 22 नवे रुग्ण सापडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण बाधित रुग्णांचा आकडा 203 इतका झाला आहे. राज्यातील नागरिकांसाठी ही चिंताजनक बाब आहे.

यातील मुंबईत 10, पुण्यात 5, नागपूरमध्ये 3, अहमदनगर 2 आणि सांगली, बुलडाणा, जळगावमध्ये प्रत्येकी एक अशा एकूण 22 कोरोनाबाधितांचा समावेश आहे. आजपर्यंत 35 रुग्ण होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोना

दरम्यान, भारतामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले 979 रुग्ण आत्तापर्यंत आढळून आले आहेत. यात 831 भारतीय तर 48 परदेशी रुग्णांचा समावेश आहे. यातील 87 जण पूर्णत: बरे झाले असून 25 जण दगावले आहेत. भारतातील विविध राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत.

सर्वात जास्त 183 रुग्ण महाराष्ट्रात असून केरळमध्ये 174 जण आढळून आले आहेत. कर्नाटकात त्याखालोखाल 76 जण कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

Last Updated : Mar 29, 2020, 9:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details