महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Electric Bus: मुंबई- पुणे महामार्गावर धावणार ५० इलेक्ट्रिक बस.. मार्च महिन्यापासून सुरुवात - ग्रीन इंधन म्हणजे इलेक्ट्रिक बस

महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग तसेच महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ यांनी सातत्याने नवीन बस खरेदी करू, असे म्हटले होते. मुंबईमध्ये एक इलेक्ट्रिक बस आणली, परंतु ती जळून खाक झाली. परंतु यासंदर्भात नुकतेच महाराष्ट्र परिवहन विभागाने घोषणा केली आहे की, नवीन 75 इलेक्ट्रिक बस खरेदी केल्या जातील. त्यातल्या 50 मुंबई पुणे या मार्गावर चालवल्या जातील.

electric bus
इलेक्ट्रिक बस

By

Published : Feb 28, 2023, 10:39 AM IST

Updated : Feb 28, 2023, 11:26 AM IST

मुंबई :शिवनेरी या बस राज्यामध्ये चालवल्या जातात त्यांना प्रतिसाद देखील आहे. या एसी बसमुळे पर्यावरण प्रदूषित होते. म्हणून पर्यावरणाला अनुकूल असलेल्या इलेक्ट्रिक बस आहे, त्या संदर्भातली योजना महाराष्ट्र एसटी महामंडळाने आखलेली आहे. त्यामुळे महत्त्वाच्या शहरांमधील प्रवासांना वातानुकूलित आणि आरामदायक असा प्रवास करता येईल. केंद्र शासनाने ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाला बसेस संदर्भात योजना अंतर्गत मदत केलेली आहे. तर केंद्र शासनाच्याच फेम दोन या सबसिडी योजनेमधून इलेक्ट्रिक बस खरेदी केल्या जात आहेत. ग्रीन इंधन असे म्हटले गेलेल्या या इलेक्ट्रिक बस म्हणजे प्रदूषणाला रोखणाऱ्या आहे. प्रदूषण कमीत कमी करणाऱ्या आहे. या बसेससाठी मुंबई पुणे या भागामध्ये सर्वाधिक ई चार्जिंग सोय असणार आहे. त्यामुळे पर्यावरणाला अनुकूल रीतीने या बस असतील.


पर्यावरण पूरक नवीन वातानुकूलित आरामदायक बस :सध्या महाराष्ट्र एसटी महामंडळाला 14000 एसटी चालवण्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये डिझेल आणि पेट्रोल लागत आहे. विशेष करून डिझेल अधिक लागते, एका दिवसाचा राज्याचा एसटीसाठी डिझेलसाठी लागणारा खर्च 8 कोटी 80 लाख रुपये इतका आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात डिझेल वापरले, तर निधी देखील अधिकचा खर्च होतो. प्रदूषण देखील होते, म्हणूनच इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा एसटी महामंडळाचा विचार आहे. जेणेकरून पर्यावरण पूरक नवीन वातानुकूलित आरामदायक बस या आपल्या राज्यात जाऊ शकेल, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपव्यवस्थापक शेखर चन्ने यांनी सांगितले.


एसटी महामंडळाचे पाऊल :शिवनेरी बस जशी मुंबई ते पुणे या मार्गावर धावते, तसेच इतर ज्या कंपन्यांद्वारे ई बस पुरवल्या जातील. त्यादेखील सध्यापुरत्या मुंबई ते पुणे या मार्गावरच धावतील. त्यानंतर पुढे राज्यभरात इतर मार्गांवर धावण्यासंदर्भातला विचार केला जाईल. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री यांनी दोन महिन्यापूर्वीच जाहीर केले होते की, महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ पंधराशे पर्यावरणाला अनुकूल अशा आणि डिझेलवर चालणाऱ्या 2000 बस खरेदी करणार आहे. त्या अनुषंगानेच आता शासनाचे पाऊल पडत आहे. शासनानेच त्यावेळेला सांगितले होते की, 5000 ज्या डिझेलवर चालवणाऱ्या ज्या बस असतील. त्यांना लिक्विफाइड नॅचरल गॅस या इंधनासाठी रूपांतर केले जाईल, ज्यामुळे पर्यावरणाला अनुकूल अशा पद्धतीने या बस असतील. त्याच रीतीने एसटी महामंडळाचे पाऊल पडत आहे.



इलेक्ट्रिक बस जळून खाक :या संदर्भात महाराष्ट्र एसटी काँग्रेस कर्मचारी संघटनेचे प्रमुख श्रीरंग बर्गे यांनी ईटीव्ही भारतसोबत संवाद साधला. ते म्हणाले की, मुंबईमध्ये एक बस इलेक्ट्रिक बस जी जळून खाक झाली. त्याची चौकशी होत आहे. तर या प्रकारचे धोके होणार नाही, हे देखील शासनाने लक्षात घेतले पाहिजे. तसेच दरमहा वेळेवर कर्मचाऱ्यांचे पगार होईल, हे देखील शासनाने यापुढे ध्यानात ठेवले पाहिजे. 75 इलेक्ट्रिक बस खरेदी केल्या जाणार आहेत.

हेही वाचा : National Science Day 2023 : राष्ट्रीय विज्ञान दिन का साजरा केला जातो, जाणून घ्या सी व्ही रामन यांच्या संशोधनाविषयी!

Last Updated : Feb 28, 2023, 11:26 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details