मुंबई- राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या काही कमी होण्याची चिन्हं दिसत नाहीत. सलग पाचव्या दिवशी कोरोग्रस्तांची संख्या आठ हजाराने वाढली आहे. विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारी नुसार आज राज्यात 8 हजार 293 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 24 तासांत 62 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
राज्यात नव्या 8 हजार 293 जणांना कोरोनाची लागण
24 तासांत राज्यात नव्या 8 हजार 293 रुग्ण कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 21 लाख 55 हजार 070 वर पोहोचली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा प्रमाण 93.95 टक्क्यांवर आहे. तर मृत्यू दर 2.42 टक्के इतका आहे. राज्यात दिवसभरात 3 हजार 753 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 20 लाख 24 हजार 704 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 3 लाख 35 हजार 942 रुग्ण होम क्वारंटाइनमध्ये असून 77 हजार 008 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात आज 'या' विभागात सर्वाधिक रुग्ण
- मुंबई महानगरपालिका क्षेत्र - 1051
- ठाणे महानगरपालिका क्षेत्र - 211
- नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र - 153
- कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्र - 180
- नाशिक महापालिका क्षेत्र - 111
- अहमदनगर -115
- जळगाव - 253
- पुणे महानगरपालिका क्षेत्र -790
- पुणे - 396
- पिंपरी चिंचवड - 399
- सातारा - 117
- औरंगाबाद महापालिका क्षेत्र - 255
- अकोला - 211
- अकोला मनपा - 177
- अमरावती - 230
- अमरावती मनपा - 632
- यवतमाळ - 166
- नागपूर - 198
- नागपूर मनपा - 796
- वर्धा - 212