मुंबई -महाराष्ट्रात लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक सरकारी, निमसरकारी आणि खासगी कार्यालयांचे काहीअंशी कामकाज सुरू करण्यात आले आहे. मागील दीड महिन्यांपासून बंद असलेल्या महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (महारेरा)तील याचिकांवरील सुनावणीला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता 'महारेरा'ही लागले कामाला; महत्त्वाच्या प्रकरणांची होणार सुनावणी - लॉकडाऊन
मागील दीड महिन्यांपासून बंद असलेल्या महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (महारेरा)तील याचिकांवरील सुनावणीला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. जी प्रकरणं अत्यंत गंभीर आणि लवकरात लवकर निकाली काढण्याची आवश्यकता आहे त्याच प्रकरणांची सुनावणी घेतली जाणार आहे.
जी प्रकरण अत्यंत गंभीर आणि लवकरात लवकर निकाली काढण्याची आवश्यकता आहे त्याच प्रकरणांची सुनावणी घेतली जाणार आहे. महारेराकडे मोठ्या संख्येने याचिका दाखल होतात. लॉकडाऊनपासून सर्व याचिकांवरील सुनावण्या बंद होत्या. आता मात्र पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात होणार आहे. आजपासून प्रकरणांची छाननी करुन कोणती प्रकरणं सुनावणीसाठी घ्यायचे याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर सुनावणीला सुरुवात होईल. महारेराने एक परिपत्रक काढत ही माहिती दिली असून तक्रारदारांसाठी ही दिलासादायक बाब आहे.
सुनावणी वगळता महारेराचे नोंदणीसह इतर सर्व कामे ऑनलाइन सुरू आहेत. त्यामुळे महारेराला तितकासा फटका बसला नाही. मात्र, महारेराचे सुनावणीचे काम बंद असल्याने तक्रारदारांना फटका बसत होता.