मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिंदे गटाला मिळणाऱ्या मंत्रीपदावर गदा आली आहे. आता शिंदे गटाची मंत्री पदे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाकडे गेली आहेत. त्यामुळे शिंदे गटाला मिळणारी मंत्री पदे आहेत, इतर पदे ही कमी होणार असल्याबाबत शिंदे गटाच्या आमदारांमध्ये निश्चितच नाराजी आहे. मात्र, असे असले तरी आम्हाला आश्वासने दिलेली मंत्रीपद येणारच असेही शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादीला मुख्यमंत्र्यांचे ऐकावे लागेल :आतापर्यंत महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही सामील होतो, तेव्हा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ऐकावे लागत होते. आम्ही वारंवार उद्धव ठाकरेंना याबाबत सांगून राष्ट्रवादी सोबत न राहता बाहेर पडावे, असे सुचवत होतो. मात्र, आता पुन्हा राष्ट्रवादी सरकारमध्ये सहभागी झाली असली तरी आम्ही आधी आलो आहोत, राष्ट्रवादी आम्हाला जॉईन झाली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राष्ट्रवादीच्या नेत्यांना ऐकावच लागेल, असा इशाराही संजय शिरसाठ यांनी दिला आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
शिंदे गटातील आमदारांची नाराजी :राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी पाठिंबा देताच शिंदे सरकारने तात्काळ मंत्री पदे दिली. शिंदे गटाचे आमदार यामुळे नाराज झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे यासंदर्भात आमदारांनी नाराजी व्यक्त करताच, त्यांनी नागपूरचा दौरा अर्धवट सोडून त्यांनी तातडीने मुंबई गाठली होती. तसेच आज कोअर कमिटीची बैठक घेऊन, तोडगा काढणार असल्याचे आश्वासन दिले आहे. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला शिंदे सरकारसोबत आणले, तसेच 9 जणांना मंत्रीपदे देखील दिली. शिंदे गटाचे आमदार यामुळे प्रचंड नाराज आहेत. शिवाय, सर्वसामान्य जनतेत बदनामी होऊ लागली आहे. शिंदे गट त्यामुळे चांगलाच आक्रमक झाला आहे.
हेही वाचा :
- Ajit Pawar Meeting: राष्ट्रवादीसाठी आजचा दिवस महत्त्वपूर्ण; अजित पवार बैठकीच्या ठिकाणी पोहोचले, एमईटी वांद्रे येथे फडकवला राष्ट्रवादीचा झेंडा
- Ajit Pawar Meeting: अजित पवार गटात जल्लोषाचे वातावरण, ३० आमदार बैठकीला दाखल
- Sharad Pawar Called Meeting : शरद पवारांचा एल्गार; राष्ट्रवादीच्या बैठकीला प्राजक्त तणपुरे दाखल, रोहीत पाटलांचे दणकेबाज भाषण