महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis : राज्यसभेत 'एनडीए' अधिक मजबूत; लोकसभेच्या निवडणुकीसाठी रणनीती तयार - राज्यसभेत एनडीए अधिक मजबूत

एनडीएतील घटक पक्षांची नाराजी वाढल्यानंतर लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच रणनीती आखायला सुरुवात केली आहे. (Maharashtra Political Crisis ) या पार्श्वभूमीवर शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सुरुंग लावत ताकद वाढवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यसभेत 'एनडीए' अधिक मजबूत करण्याचा हा प्रयत्न आहे. (displeasure of constituent parties in NDA)

NDA Stronger In Rajya Sabha
राज्यसभा

By

Published : Jul 2, 2023, 8:21 PM IST

मुंबई: भाजपला अटलबिहारी वाजपेयींच्या काळात मित्रपक्षांची गरज अधिक होती. आता मोदी शाहांच्या काळात भाजपचे वर्चस्व आहे. सध्या 303 खासदार, 95 सदस्य आहेत. मात्र सध्या महाराष्ट्र, हरियाणा आणि तामिळनाडू आदी राज्यात भाजपच्या मित्रपक्षांसोबत संबंध ताणले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे मित्रपक्ष शिवसेना, अकाली दलाने साथ सोडली. (Maharashtra Political Crises ) त्यामुळे आगामी काळात 'एनडीए'च्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता. 'एनडीए'ला भविष्यात त्याचा फटका बसेल, या धास्तीने भाजपने पुन्हा एकदा 'ऑपरेशन लोटस' राबवायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात शिवसेना फोडल्यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार, खासदारांना गळाला लावले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न होत आहे. (displeasure of constituent parties in NDA)


'एनडीए' मजबूत करण्याचा भाजपचा प्रयत्न:2024 ची लोकसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. भाजपला शह देण्यासाठी देशातील कट्टर विरोधक एकत्र आले आहेत. काँग्रेस, आप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना ठाकरे गट, डावे-ममतांसारखे कट्टर विरोधकांची नुकतीच बैठक पार पडली. दुसरीकडे 'एनडीए'मधील घटकपक्षांकडून भाजपवर दिवसागणिक नाराजी व्यक्त करत आहे. नाराजांची संख्या वाढल्याने भाजपच्या पायखालची वाळू सरकू लागली आहे. त्यामुळे पंजाबमधील अकाली दल, आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू, कर्नाटकात जेडीएसला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सोबत घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीचे प्रणते, देशातील विरोधी पक्षांचे प्रमुख नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला भाजपने हादरा देत आरोप केलेल्या आमदार, खासदारांना सत्तेत सामावून घेतले आहे. 'एनडीए' मजबूत करण्याचा भाजपचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जाते.


नाराजीचा सूर कायम:हरियाणात जननायक जनता दलासोबत भाजप सत्तेत आहे. मात्र 2024 च्या निवडणुकीत युतीबाबत साशंकता आहे. अशातच भाजपने सर्व जागांवर तयारी सुरू केल्याने नाराजीचे सूर आहेत. दक्षिणेत एआयडीएमके पक्षाला सोबत घेतले. भ्रष्ट नेत्यांवर आरोप करताना जयललितांवर टीका केली. त्यामुळे नाराजीत भर पडली. महाराष्ट्रात ही शिंदे गटाला सोबत घेतल्यानंतर लोकसभेच्या जागांवरून धूसफूस सुरू आहे. भाजपने राज्यभरातील लोकसभेच्या 45 जागांवर दावा केल्याने शिंदे गट आणि भाजपमधील अंतर्गत संबंध ताणले जात आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या अजित पवारांना सोबत घेतल्याने त्यात अधिक भर पडण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details