मुंबई - ठाकरे गटाचे आमदार (NCP Political Crisis) आदित्य ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत अजित पवार यांच्या शपथविधीवर भाष्य (Aaditya Thackeray on Ajit Pawar Rebel) केले आहे. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडले, असे म्हटले गेले, मग आज भाजपाने काय केले? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. आजच्या राजकारणातल्या गलिच्छ परिस्थितीवर भाष्य न करता काही महत्वाचे प्रश्न, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले (Maharashtra Political Crisis) आहे.
आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडले, असे म्हटले गेले. मग आज भाजपाने काय केले? आकड्यांची गरज नसतानाही राष्ट्रवादी फोडून त्यातील नेत्यांना मंत्रिपदे दिली आहेत. मंत्रिमंडळ विस्तार झाला. आधीच फेल झालेल्या डबल इंजिनाला अजून एक चाक लागले - आदित्य ठाकरे, आमदार, ठाकरे गट
आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलेले प्रश्न पुढीलप्रमाणे
- मंत्रिमंडळ विस्तार झाला. आधीच फेल झालेल्या डबल इंजिनाला अजून एक चाक लागले. चला, पण ज्या गद्दारांना मंत्रिपदाची स्वप्नं पडत होती, त्यांना १ वर्ष उलटल्यावरही काय मिळाले?
- रायगड असो, नाशिक असो, जळगाव असो... जे गद्दार स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्रास होतोय असे सांगत होते, आता राष्ट्रवादीच्या त्याच नेत्यांना मंत्रिपदे मिळाल्यावर यांचे काय होणार? आता पुन्हा गुवाहाटी?
- एक गद्दार आज टीव्हीवर म्हणाले, '१४५ जागा जिंकायच्या असतील तर यांना सोबत घ्या', असे वरिष्ठांनी सांगितले. म्हणजे हे सिद्ध झाले की मिंधेंकडे क्षमताच नाही! नाहीतर एवढं गद्दारांचं बहुमत असताना आजचा कार्यक्रम कशाला?
- आम्ही कॉंग्रेस आणि NCP सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडले, असे म्हटले गेले. मग आज भाजपाने काय केले?
आदित्य ठाकरे आक्रमक - अजित पवार यांनी राष्ट्रवादीसोबत बंड करत शिंदे-भाजप सरकारला पाठिंबा दिला. तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. यावर आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. तुमच्या गद्दारीला फक्त स्वार्थ आहे. तसेच आता ही लढाई स्वार्थी विरुद्ध स्वाभिमानी अशीच असणार आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
हेही वाचा -
- NCP Political Crisis : भावाच्या बंडानंतर बहिणीची पहिली प्रतिक्रिया; एकाच शब्दात दिले उत्तर
- Maharashtra Political Crisis : अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या 'या' आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, जाणून घ्या सविस्तर
- NCP Political Crisis : बंडखोर आमदारांनी माझ्याशी संपर्क साधला, लवकरच....; शरद पवारांची प्रतिक्रिया