मुंबई- सध्या जगभरात कोनोरा थैमान घातला आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. तर महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. संचारबंदी सुरू असतानाही अनेक जण रस्त्यावर हिंडताना दिसत आहेत. विणाकारण फिरणाऱ्यांसाठी महाराष्ट्र पोलिसांनी इशारा वजा आवाहन केले आहे. डीजीपी महाराष्ट्र या ट्विटर अकाउंटवरून एक फोटो शेअर करत बाहेर पडणाऱ्यांना वाट बदला नाहीतर वाट लागेल, असा इशारा दिला आहे.
वाट बदला नाहीतर वाट लागेल, पोलिसांचे आवाहन - पोलीस बातमी
बाहेर जात आहात.?, यू टर्न घ्या, घरी रहा, वाट बदला नाहीतर वाट लागेल, असे आवाहन पोलिसांनी विणाकारण फिरणाऱ्यांना केले आहे.
महाराष्ट्र पोलीस
बाहेर जात आहात.?, यू टर्न घ्या, घरी रहा, वाट बदला नाहीतर वाट लागेल, असा कॅप्शनही देण्यात आला आहे. यावरुन घरी बाहेर पडू नका, घरीच रहा सुरक्षित रहा. बाहेर पडल्यास पोलीसी कारवाई होईल आणि कोरोनाही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्याचा विचार आला तर थांबा, यू टर्न घ्या आणि परत घरी जा आणि सुरक्षित रहा, असे आवाहन केले आहे.
हेही वाचा -#covid19: आता 60 वर्षांवरील रुग्णांवरच मोठ्या रुग्णालयात होणार उपचार; बीएमसीचा निर्णय