मुंबई:विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. रायगडमधील दरड कोसळण्याची घटना, पावसामुळे राज्यात झालेले हाहाकार या मुद्द्यांवर अधिवेशनात आज चर्चा होण्याची शक्यता आहे. रायगडमधील दुर्घटनेनंतर बचावर कार्य सुरू आहे. त्यासाठी शासकीय स्तरावरून दुर्घटनाग्रस्त नागरिकांना मदत करण्यात येणार आहे.
Live updates
मणिपूरमधली घटना धक्कादायक आहे. मणिपूरमध्ये भाजपाचे राज्य नाही. हैवानांचे राज्य असल्याची टीका यशमोती ठाकूर यांनी केली. मणिपूरच्या घटनेनंतर पंतप्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे. महिलांवर होणारे अत्याचार पाहता सरकार काहीच करत नाही. हा एक प्रकारे महाभारत झालेला आहे. मणिपूरमध्ये दोन महिन्यांपासून घटना घडल्या आहेत. परंतु पंतप्रधानांनी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. काँग्रेसने मणिपूरमध्ये दौरा करून झालेला आहे. राहुल गांधी सुद्धा मणिपूरमध्ये जाऊन आलेले आहेत, असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.
- जीएसटी भरणाऱ्यांमध्ये अस्वस्थता- अर्थमंत्र्यांची कबुली- जीएसटी कायद्यामध्ये बदल केलेला आहे जीएसटी कायद्यामध्ये जर कोणी चूक केली तर त्याला मनी लॉन्ड्री कायद्यामध्ये पीएमएलए कायद्यामध्ये घेतले जाणार आहे. व्यापारी वर्गाला भयभीत करण्यासाठी केला बदल केल्याचा पृथ्वीराज चव्हाण यांनी आरोप केला आहे. त्यावर अर्थमंत्री अजित पवार म्हणाले, की हा बदल लक्षात आलेला आहे. एक कोटी चाळीस लाख लोक जीएसटी भरतात. मी अमित शाहांच्या लक्षात ही गोष्ट आणून दिली आहे. अप्रत्यक्षपणे काही लोकांना याचा त्रास दिला जाऊ शकतो. व्यापारी वर्गात अस्वस्थता आहे. जीएसटी भरणाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. पंतप्रधानांशी चर्चा करण्याचे आश्वासन शाह यांनी दिले. देशाच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत मी हा मुद्दा मांडणार आहे.
- खारघर दुर्घटनेप्रकरणी एकाही श्री सेवकाच्या कुटुंबातील सदस्याने तक्रार केली आहे. न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे खार उष्माघात दुर्घटना प्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करणे योग्य नसल्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. जयंत पाटील यांनी हा प्रश्न राखून ठेवण्यात यावा गृह विभागाने उत्तर द्यावे, असे म्हटले. ज्या खात्याचा प्रश्न आहे, त्या खात्याचे मंत्री उत्तर का देत आहेत? असा जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला. तीन महिन्यानंतरही चौकशी समितीला कशासाठी एक महिन्याची मुदत वाढ दिली? असा सवालही जयंत पाटील यांनी केला.
- रायगडमधील दरड कोसळण्याच्या दुर्घटनेबाबत विधानसभेत चर्चा सुरू आहेत. माधवराव गाडगीळ समितीच्या अहवालातून बोध घ्यावा, असा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारला सल्ला दिला आहे.
- खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर तिथे जाऊ शकत नाही. संध्याकाळपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येईल. माळिण गावामध्ये जसे झाले होते तशी परिस्थिती असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले म्हणाले, की खालापूरमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. बहुतांश मंत्री तिथे पोहलेले आहेत. दरडग्रस्त म्हणून हा गाव घोषित नव्हते. डोंगराच्या पायथ्याशी जे लोक राहतात ते कित्येक वर्षापासून राहत आहेत. मातीची झीज झाल्याने दरड कोसळल्याची शक्यता आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, की प्रत्येक विभाग आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. त्यांच्या जेवणाची राहण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात येत आहे. जोपर्यंत परिस्थिती पूर्ववत होत नाही तोपर्यंत तेथील सर्व लोकांना जीवनाशक वस्तू अन्नधान्य व रॉकेल पुरवठा केला जाईल.