महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Monsoon Session 2023: संभाजी भिडेंवर कारवाई करा, विरोधक आक्रमक; विधानभवनाच्या पायऱ्यावर घोषणाबाजी करत आंदोलन - Sambhaji Bhide contraversy

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसऱ्या आठवड्यातील पहिला दिवस आहे. आजही विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले. संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करून अटक करा, अशी मागणी करत विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी त्यांनी भिंडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Monsoon Session 2023
पावसाळी अधिवेशन 2023

By

Published : Aug 2, 2023, 2:16 PM IST

मुंबई :विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना काँग्रेस पक्षाकडून विजय वडेट्टीवार यांचे विरोधीपक्षनेता पदाचे नियुक्ती पत्र मंगळवारी देण्यात आले आहे. सकाळीच विजय वडेट्टीवार यांनी संभाजी भिडे यांच्यावर कारवाई संदर्भात सरकारला घेरणार असल्याचे संकेत दिले होते. त्याप्रमाणे महाविकास आघाडी म्हणजेच विरोधकांनी आज 'शिवप्रतिष्ठान'चे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त आक्षेपार्ह वक्तव्यावरून कारवाई करा, भिडेंना अटक करा व अशी मागणी करत विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत आंदोलन केले.


भिडेंना सरकारचा पाठिंबा :संभाजी भिडे काहीही बोलतात, सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही. त्यांना सरकारने संरक्षण दिलेले आहे. जर दुसरे कुणी असे वक्तव्य केले असते, तर सरकारने त्यांच्या विरोधात कारवाई केली असती. भिडे हे सरकारच्या पाठिंब्यामुळे बोलत आहेत, असा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी केला. दरम्यान आज महाविकास आघाडीची बैठक आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे, नाना पटोले, शरद पवार उपस्थित असणार आहेत. आज संध्याकाळी ७ वाजता ही बैठक होणार आहे. राज्यातील सरकारकडून सामान्य जनतेला कोणताही दिलासा मिळालेला नाही, महापुरुषांचा अवमान अशा अनेक गोष्टींवर या बैठकीत चर्चा होणार आहे.


शिंदे फडणवीस सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप :शिंदे-फडणवीस सरकारवर काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. उत्पादन शुल्क विभागात 9 वर्षाने विभागीय बदली व्हायला हवी, तरीदेखील बदल्या झाल्या नाहीत. त्यात भ्रष्टाचार झाला आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्या होणे आवश्यक आहे. पण बदल्या झाल्या नाहीत. सरकारच्या लोकांनी व अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला आहे. जर भ्रष्टाचार केला नसेल तर बदली झाली पाहिजे, असे म्हणत याबाबत आज 'लक्षवेधी' असल्याचे भाई जगताप यांनी म्हटले आहे. भिडे यांचा मनोहर असा उल्लेख करत स्वतःचे खरे नाव लावण्याची लायकी नाही. तो महात्मा गांधीवर बोलतो. वेडा माणूस बोलत आहे, अशी घणाघाती टीका भाई जगताप यांनी केली.


हेही वाचा :

  1. Maharashtra Monsoon Assembly session 2023 Updates: औरंगजेब स्टेटसची एसआयटी चौकशी करणार-देवेंद्र फडणवीस
  2. Maharashtra Politics: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची तयारी सुरू; महायुती आणि महाविकास आघाडीनेही बोलावली आज मुंबईत बैठक
  3. Parliament Monsoon session live 2023: विरोधीपक्षांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब

ABOUT THE AUTHOR

...view details