विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत दोन जागांचा निकाल जाहीर झाला असून इतर तीन जागांवर मतमोजणी सुरू आहे.
Maharashtra MLC Result Live : विक्रम काळे, सत्यजीत तांबे, धीरज लिंगाडे आघाडीवर - Nagpur graduate election
18:36 February 02
विक्रम काळे, सत्यजीत तांबे, धीरज लिंगाडे आघाडीवर
17:05 February 02
गडकरी, फडणवीसांच्या बालेकिल्ल्याला खिंडार; महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले विजयी
नागपूर - विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक निकाल जाहीर झाला आहे. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. सुधाकर अडबाले यांनी पहिल्या फेरीतचं पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण केल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले आहे.
15:47 February 02
हा विजय म्हणजे मविआला चपराक, आमदार संजय केळकर यांचे वक्तव्य
ठाण्यात कोकण शिक्षक मतदारसंघात ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय होताच भाजपकडून जल्लोष
भाजपचे जिल्हा अध्यक्ष आणि आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर यांच्या नेतृत्वात जल्लोष
हा विजय म्हणजे मविआला चपराक, आमदार संजय केळकर यांचे वक्तव्य
15:32 February 02
आम्ही आघाडीवर निवडून येऊ हा ठाम विश्वास : दिगंबर लिंगाडे
अमरावती -पदवीधर मतदारसंघात एकूण एक लाख दोन हजार मतदान झाले. अमरावती बडनेरा मार्गावर असणाऱ्या नेमानी गोडाऊन येथे मतमोजणी सुरू असून पहिल्या फेरीत एकूण 28 हजार मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. या 28 हजारांपैकी सुमारे दीड ते दोन हजार मतांनी दिगंबर लिंगाडे हे आघाडीवर असल्याचे समोर येत आहे. याबाबत स्वतः दिगंबर लिंगाडे यांनी देखील आपण आघाडीवर असल्याचे मला आत्ताच कळले असल्याचे माध्यमांची बोलताना सांगितले.
महाराष्ट्रातील जनता ही भाजपला कंटाळली आहे. आता राज्यात ते सत्तेवर कसे आले हे संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. त्यामुळे जनतेमध्ये भाजपच्या प्रती रोष आहे. या संपूर्ण निवडणुकीत जुन्या पेन्शन चा मुद्दा सर्वात महत्त्वाचा राहिला आम्ही देखील आमच्या प्रचारात हाच मुद्दा प्रामुख्याने लावून धरला होता. महाविकास आघाडीला मतदारांनी भरगोच आशीर्वाद दिले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची ही जागा निश्चितपणे निवडून येईल असा विश्वास देखील दिगंबर लिंगाडे यांनी व्यक्त केला.
15:23 February 02
महाविकास आघाडीतून छुप्या मदती यापुढेही होत राहतील; निकालावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया
गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया
पदवीधर निवडणुकीतून लोकांचा कौल समोर आला आहे. महाविकास आघाडीतून झालेल्या छुप्या मदती पुढेही होतं राहिल
आज युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय मोठ्या फरकाने झाला आहे*
कोकणाने नेहमी भगव्याची शाण राखलेली आहे तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे.
उमेदवाराचे संबध हे सर्वांशी चांगले आहे. छुपी मदत नक्कीत झाली.
काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची मोठी लॉबी आहे. शिक्षक या गोष्टीला दबून असतात. त्यामुळेच मतदानातून ते परिवर्तन घडवत आहेत.
15:11 February 02
निकालापूर्वीच महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले समर्थकांचा जल्लोष
नागपूर - विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक निकालाची प्रतीक्षा अद्याप कायम असली तरी महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबालेंची वाटचाल निर्णायक आघाडीच्या दिशेने सुरू असल्याने अडबाले समर्थकांनी जल्लोष करण्यात सुरुवात केली आहे. उत्साही कार्यकर्त्यांनी ढोलताश्याच्या गजरात गुलालाची उधळण सुरू केली आहे. सुधाकर अडबाले हे पहिल्या फेरीत पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला जातो आहे. मात्र,प्रत्यक्षात निकालाची घोषणा होण्यास अजून काही तास लागू शकतात.
14:11 February 02
नागपूर, अमरावतीसह औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर
नागपूर, अमरावतीसह औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे भाजपला धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत.
13:51 February 02
विक्रम काळे ६ हजार मतांनी आघाडीवर
विक्रम काळे यांना 18000 मते मिळाली आहेत. तर भाजपचे किरण पाटील यांना 12000 मते मिळाली आहेत.
13:31 February 02
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात भाजप समर्थीत उमेदवार नागो गाणार पिछाडीवर
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची पहिल्या फेरीची मतमोजणी अंतिम टप्प्यात आहेत. पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले आघाडीवर आघाडीवर असल्याचं चित्र आहे. भाजप समर्थीत उमेदवार नागो गाणार पिछाडीवर आहेत. विजयाची हॅट्रिक हुकणार असल्याचे चित्र आहे. अडबाले यांनी पहिल्या फेरीत मतांचा कोटा पूर्ण न केल्यास दुसऱ्या पसंतीचे मत मोजणी करावी लागेल आहे.
13:08 February 02
सत्यजीत तांबेंनी पैसे वाटले-अपक्ष उमेदवाराचा आरोप
सत्यजीत तांबेंनी पैसे वाटल्याचा आरोप नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत अपक्ष उमेदवार सुभाष जंगले यांनी केला आहे.
12:43 February 02
औरंगाबादमध्ये विक्रम काळे आघाडीवर
औरंगाबादमध्ये मतमोजणीत विक्रम काळे आघाडीवर आहेत. तर भाजपचे किरण पाटील पिछाडीवर आहेत.
12:36 February 02
महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी शेगावात गजानन महाराजांचे घेतले दर्शन
आज अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणुकीची मतमोजणी सुरू झालेली आहे. अमरावतीमध्ये ही मतमोजणी सुरू असताना महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी शेगावात गजानन महाराजांचे दर्शन घेतले आहे. कुठल्याही कामाची सुरुवात करताना आम्ही संत गजानन महाराजांचे दर्शन घेत असतो असं सांगत महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होईल असा विश्वास यावेळी धीरज लिंगाडे यांनी व्यक्त केला आहे. धीरज लिंगाडे यांनी सपत्नीक आज गजानन महाराजांचे दर्शन घेतले आहे.
12:29 February 02
कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचा डंका. भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी
कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत. बाळाराम पाटलांचा दारुण पराभव झाला आहे. पाटील यांना केवळ 9000 मते मिळाली आहेत.
12:25 February 02
नाशिक पदवीधर निवडणुकीत मतमोजणीस सुरुवात
नाशिक पदवीधर मतदारसंघात मतमोजणीस सुरुवात झाली आहे. नाशिक विभागात एकूण 49.32 टक्के मतदान झाले. सय्यद पिंपरी येथील गोदामात मतमोजणीस सुरुवात झाली आहे. 28 टेबलवर मतमोजणीस सुरुवात झाली आहे. सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात मुख्य लढत आहे.
12:18 February 02
भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंची विजयाकडे वाटचाल
भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंची विजयाकडे वाटचाल सुरू झाली आहे. कोकण मतदारसंघात ते आघाडीवर आहेत.
12:15 February 02
मराठवाडा शिक्षक संघाचे सूर्यकांत विश्वासराव आघाडीवर
औरंगाबाद : मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निकलात अविश्वासनीय कलाटणी मिळाली आहे. मराठवाडा शिक्षक संघाचे सूर्यकांत विश्वासराव आघाडीवर गेले आहेत. विद्यमान आमदार विक्रम काळे पिछाडीवर आहेत. शिक्षक संघाचे उमेदवार आघाडीवर. किरण पाटलांना तिसऱ्या क्रमांकाची आघाडी.
11:50 February 02
मराठवाडा शिक्षक मतदार संघ निकालात सूर्यकांत विश्वासराव आघाडीवर
मराठवाडा शिक्षक मतदार संघ निकालात सूर्यकांत विश्वासराव आघाडीवर आहेत.
11:21 February 02
कोकण पदवीधर निवडणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रे आघाडीवर
कोकण पदवीधर निवडणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रे आघाडीवर आहेत. अजून मतदान प्रक्रिया सुरू आहे.
11:13 February 02
मराठवाडा शिक्षक मतदारसंघात परिवर्तन होणार-किरण पाटील
मराठवाडा शिक्षक मतदारसंघात मतपत्रिकांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. मराठवाडा शिक्षक मतदारसंघात परिवर्तन होणार असल्याचा विश्वास किरण पाटील यांनी व्यक्त केला आहे.
11:08 February 02
अमरावतीत पोस्टल मतमोजणी सुरू, उमदेवारांची वाढली धाकधूक
अमरावतीत पोस्टल मतमोजणी सुरू झाली आहे.
11:04 February 02
सत्यजित तांबे यांच्या विजयाचे पुण्यात लागले पोस्टर, चर्चा तर होणारच..
नाशिकमध्ये सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात अटीतटीची लढत आहे. अशा स्थितीत सत्यजित तांबे यांच्या विजयाचे पुण्यात पोस्टर लागले आहेत. तर दुसरीकडे शुभांगी पाटील यांनीदेखील विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
10:58 February 02
नागपुरात महाविकास आघाडीचे सुधाकर आडबाले आघाडीवर
नागपुरात महाविकास आघाडीचे सुधाकर आडबाले आघाडीवर आहेत. पहिल्या टेबलवर मतमोजणी सुरू आहे.
10:51 February 02
कोकण मतदार संघासाठी मतमोजणीसाठी 2 हॉल, उघडल्या 98 मतपेट्या
कोकण मतदार संघासाठी मतमोजणीसाठी 2 हॉल असून एकूण 28 टेबल आहेत. आतापर्यंत सर्व 98 मतपेट्या उघडण्यात आल्या आहेत
10:39 February 02
अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत कोणाला मिळणार कौल?
अमरावती पदवीधर मतदारसंघासाठीचे मतदान 30 जानेवारीला पार पडले. या निवणुकीसाठी एकूण 23 उमेदवार रिंगणात आहेत. ३० जानेवारीला पार पडलेल्या मतदानामध्ये दहा १०२४०३ मतदारांनी मतदान केले. यावेळी मतदारांनी कुणाच्या बाजूने कौल दिला, याचे मोजमाप करायला आज सकाळी सात वाजतापासून नेमानी गोडाऊन येथे सुरुवात झाली आहे.
विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी २ फेब्रुवारीला सकाळी ७ पासून सुरू होत आहे. यासाठी यंत्रणा सज्ज आहे. २३ उमेदवारांसाठी १०२४०३ मतदारांनी मतदान केले. यापैकी कुणाला पदवीधरांचा कौल मिळतो, याकडे पाचही जिल्ह्यातील उमेदवार तथा मतदारांची लक्ष लागले आहे.
10:33 February 02
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत वैध- अवैध मतांची छाननी
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत वैध- अवैध मतांची छाननी सुरू आहे. एकूण २८ टेबलवर मतमोजणी होत आहे. प्रत्येक टेबलवर १ हजार मतपत्रिका याप्रमाणे मतमोजणीस सुरु आहे. उमेदवार व प्रत्येक उमेदवाराचा एक प्रतिनिधी उपस्थित आहे. सर्वप्रथम अवैध मतांना वेगळे केले जात आहे.
10:21 February 02
Maharashtra MLC Result Live : विधान परिषद निवडणूकीच्या निकालात आज कोण मारणार बाजी?
मुंबई : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 30 जानेवारीला मतदान पार पडले. त्याचा निकाल आज लागणार आहे. यात तीन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघाचा समावेश आहे. पाचही ठिकाणी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. शिवाय सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या स्वतंत्र दोन बैठका होणार आहेत.