मुंबई :महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी आज दादरमध्ये व्ह्यूइंग डेकचे उद्घाटन केले ( Inauguration of viewing deck at Dadar ) आहे. त्यानंतर बोलताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेम्हणाले, "चैत्यभूमीजवळ स्थित, आम्ही त्याला 'माता रमाबाई आंबेडकर व्हिविंग डेक' असे नाव देत आहोत. हे पूर्वी वादळाचे पाणी होते, आता पर्यटक आणि स्थानिक या दृश्याचा आनंद घेण्यासाठी येथे येऊ शकतात," आता संयुक्त महाराष्ट्राला ६० वर्ष पूर्ण होणार आहेत. यापार्श्वभूमीवर स्मृती महाराष्ट्र दालन उभारणार असल्याची ग्वाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली. तसेच कोविड निर्बंधावर त्यांनी भाष्य केले.
म्हणून उभारला माता रमाबाई आंबेडकर व्हिविंग डेक -
दादर येथील चैत्यभूमीवर येणार्या नागरिकांना मोकळे आणि निवांत बसण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी, अशी सातत्याने मागणी केली जात होती. ही बाब विचारात घेत, व्हिविंग गॅलरी उभारण्यात आली आहे. या गॅलरीला माता रमाबाई आंबेडकर व्हिविंग डेक असे नाव दिल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबई तसेच आणखी डेक उभारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मुंबईत 40 ते 44 स्टोम वॉटर ड्रेनेज आहेत. त्यांचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. येथे ही पर्यटकांना फिरण्यासाठी, बसण्यासाठी उत्तम व्यवस्था असेल, असे नियोजन केले जाईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी स्थानिक आमदार सदा सरवणकर, सभागृह नेता विशाखा राऊत आणि शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन उघडण्याचा मानस -