महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उत्तरप्रदेशमध्ये जंगल राज; गृहमंत्री अनिल देशमुख यांची टीका

उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटत आहेत. योगी सरकारवर देशभरात जोरदार टीका होत आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार टीका केली.

Anil Deshmukh
अनिल देशमुख

By

Published : Oct 2, 2020, 12:09 PM IST

मुंबई - उत्तर प्रदेशमध्ये जी घटना घडली, ती माणुसकीला काळिमा फासणारी आहे. पीडितेवर अत्याचार झाला. तिने एफआयआर देण्याचा प्रयत्न केला मात्र, तो घेतला नाही. आता पोलीस प्रशासन सांगत आहे की, अत्याचार झालाच नाही. उत्तर प्रदेशमध्ये जंगलराज असल्याचे यावरून स्पष्ट होते, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. गांधी जयंतीच्या कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी योगी सरकारवर टीका केली

सुशांतसिंह प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होते. तपास योग्य दिशेने सुरू असताना सीबीआयला मधे आणले गेले. आम्ही खूप उत्कटेने सीबीआयच्या निकालाची वाट पाहत आहोत. तीन केंद्रीय तपास यंत्रणा मुंबईत येऊन या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, सुशांतची आत्महत्या बाजूला गेली आणि ड्रग्जला समोर आणले गेले. त्याचा तपास होणे गरजेचेच आहे; मात्र, मूळ प्रकरण बाजूला पडल्याचे दिसत आहे, असेही देशमुख म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details