महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना रुग्णांत वाढ; सरकारकडून नियमावली जाहीर; संध्याकाळी 8 नंतर सार्वजनिक ठिकाणे बंद - महाराष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये वाढ

'मिशन बिगिन अगेन' अंतर्गत राज्याच्या महसूल आणि वने आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने याबाबतचे लेखी आदेश व मार्गदर्शक नियमावली जारी करण्यात आली आहे. हे आदेश 15 एप्रिलपर्यंत लागू राहणार आहेत.

कोरोना लाट
कोरोना लाट

By

Published : Mar 28, 2021, 1:04 PM IST

Updated : Mar 28, 2021, 4:03 PM IST

मुंबई -राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या दोन आठवडय़ांत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोनाची ही लाट रोखण्यासाठी मिनी लॉकडाऊन जाहीर करण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारने शनिवार मध्यरात्रीपासून रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण राज्यात जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत.

कोरोना रुग्णांत वाढ; सरकारकडून नियमावली जाहीर


विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तीला 500 रुपये दंड

या काळात चित्रपटगृहे, मॉल आणि उपाहारगृहे, तसेच उद्याने, चौपाट्यांसह सर्व सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवावी लागणार आहेत. 5 पेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येण्यावर निर्बंध असतील. या निर्बंधाचे उल्लंघन केल्यास प्रत्येकी 1 हजार रुपये दंड आकारण्यात येईल. तसेच विनामास्क फिरणाऱ्यांना ५०० रुपये दंड ठोठावला जाणार आहे. सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली असून. सभागृहे किंवा नाटय़गृहांचा उपयोग करता येणार नाही. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १००० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

हेही वाचा- स्कॉर्पिओत धमकीचे पत्र ठेवायला विसरला होता सचिन वाझे

मार्गदर्शक नियमावली जारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता. या बैठकीला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन, जिल्हा तसेच राज्य टास्क फोर्सचे सदस्य, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता उपस्थित होते. या बैठकीनंतर रविवारपासून संपूर्ण राज्यात रात्रीची जमावबंदी लागू करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. 'मिशन बिगिन अगेन' अंतर्गत राज्याच्या महसूल आणि वने आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने याबाबतचे लेखी आदेश व मार्गदर्शक नियमावली जारी करण्यात आली आहे. हे आदेश 15 एप्रिलपर्यंत लागू राहणार आहेत.

हेही वाचा-रेड्डीची मेळघाटात 'पैसे खाऊ टीम'; खासदार नवनीत राणा यांचा आरोप

Last Updated : Mar 28, 2021, 4:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details