मुंबई -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार त्याचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार ठेवला असल्याचे जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयावर काँग्रेस नेत्यांनी टीकाही केली होती. पण, आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारने माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तींना दिवंगत राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देणार असल्याची घोषणा केली आहे. हा पुरस्कार देण्याबाबत का शासन निर्णय देखील राज्य सरकारने जारी केलेला आहे.
आघाडी सरकार देणार माहिती अन् तंत्रज्ञान क्षेत्रात राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार - राजीव गांधी पुरस्कार बातमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार त्याचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार ठेवला असल्याचे जाहीर केले. आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारने माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तींना दिवंगत राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देणार असल्याची घोषणा केली आहे. हा पुरस्कार देण्याबाबत का शासन निर्णय देखील राज्य सरकारने जारी केलेला आहे.
तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना देशांमध्ये माहिती प्रसारण तंत्रज्ञान व विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडवून आणली होती. त्यामुळे राजीव गांधी स्मृती दिनानिमित्त माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात यावा याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. 20 ऑगस्ट, 2021 रोजी या पुरस्काराची घोषणा करून 30 ऑक्टोबर, 2021 पूर्वी संस्था निवडीचे निकष व चयन महाराष्ट्र तंत्रज्ञान व माहिती महामंडळामार्फत पुरस्कार देण्यात यावा, असे शासन आदेशात सांगण्यात आला आहे.
हेही वाचा -थेट मंत्रालयातच 'चिअर्स'! दारूच्या बाटल्या सापडल्या, विरोधक आक्रमक