मुंबई - आज १ मे निमित्त महाराष्ट्र दिन सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. मुंबईत हुतात्मा स्मारकात मध्यरात्री १२ वाजता शिवसेना खासदार व दक्षिण मुंबईचे उमेदवार अरविंद सावंत यांनी शिवसैनिकांसह अखंड महाराष्ट्रासाठी रक्त सांडणाऱ्या हुताम्यांना आदरांजली वाहिली.
अखंड महाराष्ट्रासाठी रक्त सांडणाऱ्या हुताम्यांना शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी वाहिली आदरांजली - mumbai
यावेळी शिवसैनिकांच्या बेळगाव, निपाणी, भालकी आणि कारवारसह संयुक्तं महाराष्ट्र झालाच पाहिजे, या घोषणांनी हुतात्मा चौक परिसर दणाणून निघाला.
हुतात्मा चौकात महाराष्ट्र दिनाचे स्वागत
३० एप्रिलच्या रात्री अरविंद सावंतांच्या नेतृत्वाखाली अनेक शिवसैनिक हुतात्मा चौकात जमले होते. यावेळी महाराष्ट्र दिनाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत हुतात्मा झालेल्या सर्व शहिदांना मानवंदना देण्यात आली. बेळगाव, निपाणी, भालकी आणि कारवारसह संयुक्तं महाराष्ट्र झालाच पाहिजे, या घोषणांनी हुतात्मा चौक परिसर दणाणून निघाला.