महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Breaking News : उरणमध्ये 20 दुकाने जाळून खाक

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
Maharashtra Breaking News

By

Published : Jan 2, 2023, 6:40 AM IST

Updated : Jan 2, 2023, 7:58 PM IST

19:54 January 02

उरणमध्ये 20 दुकाने जाळून खाक

मुंबई -उरण तालुक्यातील सोनारी गावाच्या हद्दीमध्ये असणारी 20 दुकाने जाळून खाक झाली आहेत. प्रकल्पग्रस्त बेरोजगार स्थानिकांना उदरनिर्वाहाचे साधान मिळावे या हेतूने जेएनपीटी बंदर प्रशासनाकडून ही दुकाने देण्यात आली होती. मात्र ही दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडल्याने येथील 20 कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

19:43 January 02

कांजवाला अपघात प्रकरणी अमित शहा यांचे सविस्तर अहवाल ताबडतोब देण्याचे पोलिसांना आदेश

नवी दिल्ली - कांजवाला येथे एका मुलीच्या मृत्यूने संपूर्ण देश हादरला आहे. एका वाहनाने मुलीला अनेक किलोमीटर रस्त्यावर ओढून नेले. त्यामुळे सगळेच हैराण झाले आहेत. आता या प्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली पोलिसांना या प्रकरणाचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

19:08 January 02

राज्यभरातून सुमारे 7000 निवासी डॉक्टर संपावर, उद्याही संप सुरू राहणार

मुंबई - राज्यभरातून सुमारे 7000 निवासी डॉक्टर आज संपावर गेले होते. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या दाव्यावर निवासी डॉक्टरांचा भरवसा नाही, त्यामुळे हा संप करण्यात आला. राज्यात नॉन इमर्जन्सी ओपीडींवर संपाचा 100 टक्के परिणाम झाला. कोविड योध्ये म्हटले गेलेल्या १०८२ डॉक्टरांना अद्यापही 13 कोटी रुपये शासनाने दिले नाहीत. डॉक्टरांना याची खंत आहे. त्यामुळे निवासी डॉक्टरांचा संप उद्या देखील सुरूच राहणार आहे.

18:59 January 02

सत्तार यांचे वक्तव्य चुकीचे होते - दीपक केसरकर

मुंबई - पदे जनतेची कामे करण्यासाठी दिली आहेत. हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे असे मत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. सत्तार यांचे वक्तव्य चुकीचे होते, त्यांनी असे बोलायला नको होते असेही केसरकर यांनी स्पष्ट केले. त्यांनी पक्षाच्या व्यासपीठावर बोलायला हवे होते असे मतही त्यांनी मांडले.

18:32 January 02

शिवराज सिंह चौहान यांनी केली त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात पूजा

नाशिक - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात पूजा केली.

18:11 January 02

हेरॉइन वाहून नेणारे जुने तुटलेले पाकिस्तानी ड्रोन जप्त

गुरुदासपूर - येथील कोसोवाल सेक्टर मध्ये आंतरराष्ट्रीय सीमेपासून 2 किलोमीटर अंतरावर BSF जवानांनी सुमारे एक किलोग्रॅम हेरॉइन वाहून नेणारे जुने तुटलेले पाकिस्तानी ड्रोन जप्त केले.

17:40 January 02

शीझान खानची जामीनासाठी याचिका दाखल, निर्दोष असल्याचा दावा

पालघर - तुनिषा शर्माच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला टेलिव्हिजन अभिनेता शीझान खान याने सोमवारी जामिनासाठी पालघर जिल्ह्यातील न्यायालयात याचिका केली आहे असे त्याच्या वकिलाने सांगितले. वसई शहरातील सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अभिनेत्याच्या जामीन याचिकेवर ७ जानेवारी रोजी सुनावणी होणार असल्याचे खानचे वकील शरद राय यांनी सांगितले.

17:26 January 02

सामना असल्याने वानखेडे स्टेडियम परिसरात वाहतूक मार्गात बदल

मुंबई - वानखेडे स्टेडियम येथे उद्या होणाऱ्या भारत विरुद्ध श्रीलंका टी 20 क्रिकेट सामना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांच्या आणि वाहनांची गर्दी होणार हे निश्चित आहे.त्यामुळे मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने वाहतुकीच्या मार्गात बदल केले आहेत.

16:19 January 02

मेरी पाठशाळा आंदोलनात पाकिस्तान झिंदाबादची घोषणाबाजी

भिवंडी -भिवंडी महानगरपालिकेसमोर सुरू असलेल्या मेरी पाठशाळा आंदोलनात पाकिस्तान झिंदाबादची घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी आंदोलन उधळून लावत आयोजकांना ताब्यात घेतले. भिवंडीत विस्डम शाळेने काही विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकून त्यांचे दाखले परस्पर पोस्टाने धाडल्याने त्या विरोधात आंदोलन सुरू होते. आज सकाळी 11 वाजता आंदोलन सुरू असताना शाळकरी विद्यार्थ्याने 'पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याने आंदोलन भरकटले. पोलिसांनी 19 आंदोलकांना ताब्यात घेतले.

15:56 January 02

नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेला फटका बसला, काँग्रेसची टीका

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसने नरेंद्र मोदी सरकारवर नोटाबंदीबाबत टीका केली. सर्वोच्च न्यायालयाने 2016 च्या मोदींच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. या निर्णयात कोणतीही कायदेशीर किंवा घटनात्मक त्रुटी नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तो मान्य नाही असे काँग्रेसने म्हटले आहे.

15:52 January 02

पोलिसाने चालत्या ट्रेनसमोर उडी मारून केली आत्महत्या

नागपूर - येथील रेल्वे क्रॉसिंगवर एका ५५ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याने चालत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी याची माहिती सोमवारी दिली. रविवारी रात्री ८ च्या सुमारास हेड कॉन्स्टेबल प्रमोद राऊत आपल्या मोटरसायकलवरून मनीष नगर रेल्वे क्रॉसिंगवर आले होते. त्यांनी आपली दुचाकी उभी केली आणि ते क्रॉसिंगवर गेले. तेथे त्यांनी चालत्या ट्रेनसमोर उडी मारली. तो जागीच ठार झाले, असे पोलिसांनी सांगितले.

15:46 January 02

नववर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान अल्पवयीन मुलीचा विनयभंग

मुंबई - येथील उपनगरातील जुहू येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये नवीन वर्षाच्या पार्टीत एका 12 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार पोलिसांनी मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मुलगी तिच्या पालकांसह हॉटेलमध्ये आली होती. त्याचवेळी 29 वर्षीय आरोपीने तिचा विनयभंग केला.

14:58 January 02

ढोरेगाव शिवारात उसाच्या शेतात तरुणाचा मृतदेह

औरंगाबाद - ढोरेगाव शिवारात उसाच्या शेतात तरुणाचा मृतदेह आढळला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

14:18 January 02

पत्नीवर संशय, बापाने 2 दिवसांच्या बाळाला जमिनीवर आपटले

नागपूर:अवघ्या दोन दिवसांच्या बाळाला एका निर्दयी बापाने जमिनीवर आपटल्याची खळबळजनक घटना नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घडली आहे. आरोपी गिरीश महादेव गोंडाने याला अजनी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन हे अमानवीय कृत्य केल्याची माहिती तपासत समोर आली आहे.

13:54 January 02

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ५२ आरोग्य केंद्र सुरू

मुंबई - मुंबईतील गरीब नागरिकांना घराजवळ त्वरित मोफत उपचार मिळावेत यासाठी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ ५२ आरोग्य केंद्र सुरू करण्यात आली आहेत. आज सोमवारपासून आणखी २४ केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. तर फेब्रुवारीमध्ये आणखी केंद्रे वाढवली जाणार असल्याने ही संख्या १०० पर्यंत जाणार आहे. मार्चपर्यंत २०० आरोग्य केंद्रे सुरू करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली.

13:51 January 02

धारावी पुनर्वसन प्रकल्प प्रकरणासंदर्भातली याचिका कोर्टाने काढव्या निकालात

मुंबई -धारावी पुनर्वसन प्रकल्प प्रकरण संदर्भातली याचिकेत माहिम नेचर पार्कचा समावेश धारावी पुनर्विकास आराखड्यात नाही असे म्हटले आहे. वनशक्ती आणि इतर संघटनेने दाखल केलेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढल्या आहेत. बीकेसी आणि माहिमखाडी दरम्यानचा खारफुटीचा पट्टा पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे. हा भाग धारावी पुनर्विकास प्रकल्पात समाविष्ट नसल्याची राज्य सरकार संबंधित प्रशासनातर्फे मुंबई उच्च न्यायालयात हमी देण्यात आली. त्यानंतर ही याचिका निकाली काढण्यात आली.

13:04 January 02

सुलतानपुरीमध्ये महिलांची जोरदार निदर्शने

दिल्ली: 1 जानेवारी रोजी सुलतानपुरी भागात कारने काही किमीपर्यंत खेचून घेतल्याने मरण पावलेल्या महिलेच्या मृत्यूच्या निषेधार्थ महिलांनी जोरदार निदर्शने केली. लोक सुलतानपुरी पोलिस स्टेशनच्याबाहेर निषेध करण्यासाठी जमले होते. महिलांनी गाड्या आडवून निदर्शने केली.

12:42 January 02

छत्रपती संभाजीराजे स्वराज्यरक्षक आणि धर्मवीरदेखील- संभाजीराजे छत्रपती

छत्रपती संभाजीराजे स्वराज्यरक्षक आणि धर्मवीरदेखील आहेत. संभीज महाराजांनी धर्माचे रक्षण केले अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.

12:27 January 02

महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंता संघर्ष समितीचे ठाण्यात आंदोलन

ठाणे -महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अधिकारी अभियंता संघर्ष समिती वसई मंडळ यांच्या माध्यमातून ठाण्यात मोठे आंदोलन करण्यात येत आहे. महावितरण अदानी यांच्याकडे जात असल्याच्या विरोधात महावितरण कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. प्रस्तावित मागण्या पूर्ण करण्यासाठी यावेळी निदर्शने करण्यात आली. वसई मंडळ मधील सर्व कर्मचारी, अधिकारी आणि अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

12:24 January 02

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जाणार

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. याच म्हणजे जानेवारी महिन्यात याबाबतचे नियोजन करण्यात येणार आहे.

12:16 January 02

अनिल देशमुख जामिनावर सुटल्यानंतर ईडी कार्यालयात हजेरीसाठी दाखल

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख जामिनावर सुटल्यानंतर आज ईडी कार्यालयात हजेरीसाठी आले होते. अनिल देशमुख यांच्या जामीनाच्या अटीमध्ये जामीन मिळाल्यानंतर दोन महिने कार्यालयात जाऊन हजेरी नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याच अटीच्या पूर्ततेकरता आज अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर राहिले.

11:18 January 02

शीझानच्या कुटुंबियांनी तुनिषाच्या कुटुंबीयांचे सर्व आरोप फेटाळले

तुनिषाच्या कुटुंबीयांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. शीझान खानच्या आई आणि बहिणीने सर्व आरोप फेटाळले आहेत.

11:13 January 02

नोटाबंदीचा निर्णय घटनाबाह्य नाही, आर्थिक निर्णयप्रक्रियेत कोर्टाला मर्यादित अधिकार

500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा केंद्र सरकारचा 2016 मध्ये घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने केंद्राच्या 2016 च्या नोटाबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. नोटाबंदीचा निर्णय एकट्या आरबीआयला घेता येत नाही. टाळाबंदीपूर्वी केंद्र आणि आरबीआयमध्ये सल्लामसलत झाली होती, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

11:11 January 02

प्रसाद पुरोहित यांचा दोषमुक्तीचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. प्रसाद पुरोहित यांचा दोषमुक्तीचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायमूर्ती ए. एस. गडकरी आणि न्यायमूर्ती पी. डी. नाईक यांच्या खंडपीठाचा निर्णय आहे.

10:55 January 02

अनिल देशमुख जामिनावर सुटल्यानंतर आज ईडी कार्यालयात हजेरी नोंदविणार

माजी गृहमंत्री अनिल देशमुख जामिनावर सुटल्यानंतर आज ईडी कार्यालयात हजेरी नोंदवण्याकरिता जाणार आहेत. अनिल देशमुख यांना घेण्यात आलेल्या जामीनांमध्ये अटीमध्ये जामीन मिळाल्यानंतर दोन महिने कार्यालयात जाऊन हजेरी नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याच अटीच्या पूर्तते करिता आज अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत.

10:45 January 02

राजौरी येथील दहशतवादी हल्ल्याचा नायब राज्यपालाकडून निषेध

जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी राजौरी येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. या भीषण हल्ल्यात शहीद झालेल्या प्रत्येक नागरिकाच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये आणि सरकारी नोकरी दिली जाईल. गंभीर जखमींना एक लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याची घोषणा नायब राज्यपालाच्या कार्यालयाकडून करण्यात आली आहे.

10:13 January 02

शिंदे गटातील निम्मे आमदार भाजपात जातील-संजय राऊत

दोन्ही गट एकत्र यावेत असे दीपक केसरकर यांनी आत्मपरीक्षण केले. शिंदे गटातील निम्मे आमदार भाजपात जातील, असे भाकीत खासदार संजय राऊत यांनी केले.

09:44 January 02

निवासी डॉक्टरांच्या संपात ससूनमधील डॉक्टरही सहभागी

निवासी डॉक्टरांच्या संपात ससूनमधील डॉक्टरही सहभागी झाले आहेत. राज्यभरातील संपात सुमारे ७ हजार डॉक्टर सहभागी होणार आहेत. संपानंतर सरकारी रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे.

09:36 January 02

दहशतवाद्यांनी केलेल्या 4 नागरिकांच्या हत्येनंतर नागरिकांची राजौरीत निदर्शने

काल अप्पर डांगरी गावात दहशतवाद्यांनी केलेल्या 4 नागरिकांच्या हत्येबद्दल राजौरीतील डांगरी येथील मुख्य चौकात लोकांनी निदर्शने केली. जिल्हा प्रशासन अपयशी ठरले आहे. एलजी मनोज सिन्हा यांनी येथे येऊन आमच्या मागण्या ऐकून घ्याव्यात, अशी आमची मागणी आहे, असे स्थानिक सांगतात.

09:11 January 02

भाई केशवराव धोंडगे यांच्या निधनाने मराठवाडा पोरका झाला- अंबादास दानवे

मराठवाड्याची मुलुखमैदानी तोफ अशी ओळख असलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते शेतकरी कष्टकऱ्यांच्या विकासासाठी वेळोवेळी आग्रही भूमिका घेणारे महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, स्वातंत्र्यसेनानी भाई केशवराव धोंडगे यांच्या निधनाने मराठवाडा पोरका झाला असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी यांनी व्यक्त करत भाई यांना श्रद्धांजली वाहिली. या दुःखद समयी धोंडगे यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो अशा सहवेदना त्यांनी कुटुंबियांप्रति व्यक्त केल्या.

08:47 January 02

माउंट मेरी चर्च उडवून धमकी देणाऱ्याला कोलकातामधून अटक

माउंट मेरी चर्च उडवून देण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला पश्चिम बंगालमधील कोलकाता येथून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.

06:59 January 02

माहीम आणि विरार भागातून 610 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी सेलच्या घाटकोपर युनिटने माहीम आणि विरार भागातून 610 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले, आफ्रिकन महिला तस्करांसह 3 जणांना अटक केली, जप्त केलेल्या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 1.22 कोटी रुपये आहे. गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी कक्षाने दिली आहे.

06:57 January 02

मेघालयातील नोंगपोह येथे ३.२ रिश्टर क्षमतेचा भूकंप

1 जानेवारी 2023 रोजी रात्री 11.28 वाजता मेघालयातील नोंगपोह येथे ३.२ रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला.

06:55 January 02

घोरपडीची ११७ कातडे ठाण्यातून जप्त, वनाधिकाऱ्यांची कारवाई

मालाड येथील कुंभारपाडा येथील भगवान मंडलकर यांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. तिथे मातीच्या भांड्यात घोरपडीच्या चामड्याची वाद्ये सापडली. पोलिसांनी 117 कातडे जप्त केल्याची माहिती ठाण्याचे वन अधिकारी राकेश भोईर यांनी दिली.

06:51 January 02

वांद्रे टर्मिनस-जोधपूर सूर्यनगरी एक्सप्रेस रुळावरून 11 डबे घसरले

वांद्रे टर्मिनस-जोधपूर सूर्यनगरी एक्सप्रेस रुळावरून घसरल्याने 11 डबे प्रभावित झाले आहेत. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अडकलेल्या प्रवाशांसाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे जेणेकरून ते त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचू शकतील, असे उत्तर पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

06:15 January 02

Breaking News : राज्यामधील हजारो निवासी डॉक्टरांचा आज सकाळपासून संप

मुंबई :राज्यामधील हजारो निवासी डॉक्टर आज सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू करणार आहेत. निवासी डॉक्टरांच्या रिक्त पदांची भरती, कोविड काळातील आठ महिन्याचा प्रलंबित महागाई भत्ता, तसेच समान वेतन आणि इतर मागण्यांसाठी आज सकाळपासून काम बंद आंदोलन करणार आहेत. डॉक्टरांच्या इशारानुसार बहुतेक ओपीडीदेखील आज सकाळपासून बंद राहण्याची दाट शक्यता आहे.

Last Updated : Jan 2, 2023, 7:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details