मुंबई -राज्यात आज (शुक्रवारी) ५,२२९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १८,४२,५८७ वर पोहोचला आहे. तर याबरोबरच राज्यात आज १२७ कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. आतापर्यंत एकूण ४७,५९९ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५८ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ८३,८५९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
८३,८५९ अॅक्टिव्ह रुग्ण -
राज्यात आज ६,७७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण १७,१०,०५० कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.८१ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज १२७ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,११,३२,२३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,४२,५८७ नमुने म्हणजेच १६.५५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५,४७,५०४ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये तर ५,५६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण ८३,८५९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.