महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Corona Update : राज्यात रविवारी 40 हजार 805 रुग्णांची नोंद; तर 44 बाधितांचा मृत्यू - महाराष्ट्र कोरोना मृत्यू 23 जानेवारी 2022

राज्यात रविवारी 40,805 नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. ( Maharashtra Corona Update ) तर 44 बाधितांचा मृत्यू झाला. तर 44 जणांचा मृत्यू झाला असून 27 हजार 377 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ( Maharashtra Health Department ) दिली आहे.

Maharashtra Corona Update
महाराष्ट्र कोरोना अपडेट

By

Published : Jan 23, 2022, 8:30 PM IST

Updated : Jan 23, 2022, 10:27 PM IST

मुंबई -कोरोनाच्या संसर्गात दिवसेंदिवस चढ-उतार पाहायला मिळत असून आज दिवसभरात 40 हजार 805 नव्या रुग्णांची नोंद झाली. ( Maharashtra Corona Update 23rd January 2022 ) त्यापैकी 44 जणांचा मृत्यू झाला असून 27 हजार 377 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ( Maharashtra Health Department ) दिली आहे. ओमायक्रॉनचा आज एकही रुग्ण राज्यभरात आढळून आला नसल्याचे ( No Omicron Patient Found in Maharashtra ) आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.15 टक्के -

गेल्या चार दिवसांपासून रुग्ण संख्येत सातत्य असल्याचे दिसून येत आहे. आजही 40 हजार 805 रुग्ण आढळून आले असून 44 रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे आजपर्यंत 75 लाख 7 हजार 225 रुग्ण सापडले आहेत. तर 1 लाख 42 हजार 115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात आजच्या 44 मृतांचा समावेश आहे. राज्यातील मृत्यूदर 1.89% एवढा आहे. तर 27 हजार 337 इतके रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आजपर्यंत 70 लाख 67 हजार 955 करोना बाधित बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 94.15 टक्के एवढे आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7 कोटी 33 लाख 69 हजार 912 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 75 लाख 07 हजार 225 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 20 लाख 86 हजार 024 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 3373 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 2 लाख 93 हजार 305 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

ओमायक्रॉनचा आज एकही रुग्ण नाही -

राज्यात ओमायक्रोनचा आज एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही. शनिवारी 416 रुग्ण आढळून आले होते. मात्र रविवारी एकही सापडला नाही. त्यामुळे राज्यात आजपर्यंत ओमायक्रोनचे 2 हजार 759 एवढे रुग्ण आहेत. आज 1437 जणांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडण्यात आले.

हेही वाचा -Covid 19 Vaccination : राज्यात कोरोना लस बंधनकारक नाही, मात्र नागरिकांना विनंती करून लस घेण्यासाठी भाग पाडू - राजेश टोपे

विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -

मुंबई महापालिका - 2550
ठाणे - 369
ठाणे मनपा - 546
नवी मुंबई पालिका - 1166
कल्याण डोबिवली पालिका - 276
मीरा भाईंदर - 187
वसई विरार पालिका - 189
नाशिक - 712
नाशिक पालिका - 1644
अहमदनगर - 1036
अहमदनगर पालिका - 487
पुणे - 2971
पुणे पालिका - 6284
पिंपरी चिंचवड पालिका - 4085
सातारा - 1069
नागपूर मनपा - 3477

Last Updated : Jan 23, 2022, 10:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details