महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोना नियंत्रणात; शनिवारी दीड हजार नवे बाधित - महाराष्ट्र कोरोना अपडेट 19 फेब्रुवारी

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली (Corona Control) आहे. आज (19 फेब्रुवारी) दिवसभरात एक हजार 635 जणांना कोरोनाची लागण (Today Corona New Cases) झाली आहे. तर 29 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 18 हजारच्या आसपास आहेत.

corona file photo
कोरोना फाईल फोटो

By

Published : Feb 19, 2022, 8:06 PM IST

Updated : Feb 19, 2022, 8:20 PM IST

मुंबई - राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट (Corona Control) झाली आहे. आज (19 फेब्रुवारी) दिवसभरात एक हजार 635 जणांना कोरोनाची लागण (19 Feb New Corona Cases) झाली आहे. तर 29 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 18 हजारच्या आसपास (Active Corona Cases) आहेत. आज राज्यात पाचव्या दिवशी ओमायक्रॉनचा एकही रुग्ण सापडला नसल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण घटले आहेत. आज 1 हजार 635 रुग्णांची नोंद झाली आहे. बुधवारी 2 हजार 748, गुरुवारी 2 हजार 797, शुक्रवारी 2 हजार 68 बाधितांची नोंद झाली होती. आज ही संख्या हजारने घटली आहे. आज 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी 15 जणांचा मृत्यू झाला होता. आज 4 हजार 394 रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण 97.89 टक्के आहे.

  • 18 हजार 368 कोरोना सक्रिय रुग्ण -

आजपर्यंत 7 कोटी 71 लाख 29 हजार 145 कोविड चाचण्या केल्या. त्यापैकी 10.19 टक्के इतके म्हणजेच 78 लाख 56 हजार 994 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 22 हजार 920 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 1081 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 18 हजार 368 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

  • ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही-

कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेला ओमयक्रॉनचे गेले दोन दिवस एकही रुग्ण सापडला नाही. आजपर्यंत 4 हजार 456 एवढे रुग्ण बाधित झाले आहेत. तर 3768 जणांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने सर्वांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत 8904 जणांची जनुकीय चाचणी केली. 7991 चाचण्याचे अहवाल प्राप्त झाले असून 913 नमुने प्रलंबित आहेत.

  • विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -

मुंबई महापालिका - 201

ठाणे - 16

ठाणे मनपा - 30

नवी मुंबई पालिका - 27

कल्याण डोबिवली पालिका - 7

मीरा भाईंदर - 10

वसई विरार पालिका - 6

नाशिक - 56

नाशिक पालिका - 29

अहमदनगर - 81

अहमदनगर पालिका - 22

पुणे - 109

पुणे पालिका - 278

पिंपरी चिंचवड पालिका - 114

सातारा - 24

नागपूर मनपा - 71

Last Updated : Feb 19, 2022, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details