महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पॉझिटिव्ह बातमी...! राज्यात आज ९४ रुग्णांना घरी सोडले.. - महाराष्ट्र कोरोना बातमी

आज राज्यात २७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३६९ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईचे १५, अमरावती शहरातील ६, पुणे शहरातील ४ तर जळगाव येथील १ आणि औरंगाबाद शहरातील १ आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे

By

Published : Apr 27, 2020, 10:03 PM IST

Updated : Apr 28, 2020, 8:17 PM IST

मुंबई -राज्यातकोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आज कोरोनाबाधित ५२२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्णसंख्या ८५९० झाली आहे. आज ९४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२८२ रुग्ण बरे झाले आहेत, तर एकूण ६९३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख २१ हजार ५६२ नमुन्यांपैकी १ लाख २ हजार ५२ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत तर ८५९० जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ४५ हजार ६७७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ९,३९९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात २७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३६९ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईचे १५, अमरावती शहरातील ६, पुणे शहरातील ४ तर जळगाव येथील १ आणि औरंगाबाद शहरातील १ आहे. अमरावतीत झालेले मृत्यू हे दिनांक २० ते २५ एप्रिल २०२० या कालावधीतील आहेत.

आज झालेल्या मृत्यूंपैकी १५ पुरुष तर १२ महिला आहेत. आज झालेल्या २७ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १३ रुग्ण आहेत तर ८ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत, तर ६ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या २७ रुग्णांपैकी २२ जणांमध्ये (८१ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. यातील एकाला एचआयव्ही आणि आणखी एका रुग्णाला कर्करोग होता.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील : (कंसात मृतांची आकडेवारी)


मुंबई महानगरपालिका: ५७७६ (२१९)
ठाणे: ४० (२)
ठाणे मनपा: २९५ (४)
नवी मुंबई मनपा: १३५ (३)
कल्याण डोंबिवली मनपा: १४५ (३)
उल्हासनगर मनपा: २
भिवंडी निजामपूर मनपा: १४
मीरा भाईंदर मनपा: १२१ (२)
पालघर: २५ (१)
वसई विरार मनपा: १२१ (३)
रायगड: १८
पनवेल मनपा: ४३ (१)


ठाणे मंडळ एकूण: ६७३५ (२३८)
नाशिक: ४
नाशिक मनपा: १९
मालेगाव मनपा: १२३ (१२)
अहमदनगर: २६ (२)
अहमदनगर मनपा: १६
धुळे: ४८(२)
धुळे मनपा: १७ (१)
जळगाव: १८ (४)
जळगाव मनपा: २ (१)
नंदूरबार: ११ (१)


नाशिक मंडळ एकूण: २४४ (२३)
पुणे:५८ (३)
पुणे मनपा: ९६९ (७४)
पिंपरी चिंचवड मनपा: ७२ (३)
सोलापूर: ६
सोलापूर मनपा: ५९ (५)
सातारा: २९ (२)


पुणे मंडळ एकूण: ११९३ (८७)
कोल्हापूर: ७
कोल्हापूर मनपा: ४
सांगली: २६
सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)
सिंधुदुर्ग: १
रत्नागिरी: ८ (१)

कोल्हापूर मंडळ एकूण: ४७ (२)
औरंगाबाद:१
औरंगाबाद मनपा: ५१ (६)
जालना: २
हिंगोली: ८
परभणी: ०
परभणी मनपा: १

औरंगाबाद मंडळ एकूण: ६३ (६)
लातूर: १० (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ०
नांदेड मनपा: ३

लातूर मंडळ एकूण: १७ (१)
अकोला: ११ (१)
अकोला मनपा: १८
अमरावती: १
अमरावती मनपा: २१ (७)
यवतमाळ: ६२
बुलढाणा: २१ (१)
वाशिम: १

अकोला मंडळ एकूण: १३५ (९)
नागपूर: ४
नागपूर मनपा: १२३ (१)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: ०
चंद्रपूर मनपा: २
गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: १३१ (१)
इतर राज्ये: २५ (२)
एकूण: ८५९० (३६९)


राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ५७२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ७८६१ सर्व्हेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ३२.२८ लाख लोकसंख्येचे सर्व्हेक्षण केलेले आहे.

Last Updated : Apr 28, 2020, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details