मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी दुसरीकडे कोविड प्रतिबंधात्मक लसीचा वेग ही वाढला आहे. शनिवारी एकाच दिवशी राज्यात सुमारे ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांनी लस घेतली. दरम्यान, गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांना मागे टाकत महाराष्ट्र लसीकरणात अग्रेसर ठरला आहे. आतापर्यंत सुमारे ७३ लाख ४७ हजार ४२९ जणांनी यावेळी लसीकरण केल्याची माहिती राज्य शासनाने दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.
मुख्ममंत्र्यांनी बोलवली मंत्रिमंडळाची तातडीची बैठक; लॉकडाऊनबाबत निर्णय होण्याची शक्यता - महाराष्ट्र कोरोना न्यूज
13:39 April 04
लसीकरणात महाराष्ट्र अग्रेसर; एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार नागरिकांना डोस
13:20 April 04
मुंबईबाबत आज कठोर निर्णय घ्यावा लागेल- पालकमंत्री अस्लम शेख यांचे संकेत
मुंबई - कोरोनाचा संसर्ग वाढत असताना नागरिक नियमांचे पालन करत नाहीत. उलट रस्त्यांवरील, बाजारपेठेत गर्दी वाढत आहे. परिणामी परिस्थिती चिंताजनक बनली आहे. यामुळेच मुंबईबाबत आज कठोर निर्णय घ्यावा लागेल, असे संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत. रविवारी दादर परिसरातील मंडईची पाहणी केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यामुळे मुंबईत आज रात्रीपासून कठोर निर्बंध किंवा मिनी लॉकडाऊनची शक्यता वर्तवली जात आहे.
12:29 April 04
लॉकडाऊन नाही मात्र, मुंबईत पुण्याच्या धर्तीवर निर्बंध लागू शकतात -किशोरी पेडणेकर
मुंबई - मुंबईत लॉकडाऊन लागण्याची शक्यता नाही मात्र, पुण्याच्या धर्तीवर निर्बंध लागू शकतात, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच जनता पूर्वीसारखी कोरोना नियम पाळत नाही. लोक बिनधास्त झाले आहेत. जर तुम्हाला लॉकडाऊन नको असेल तर मग तुम्ही नियम पाळणार का असा सवाल त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री संयमाने पावले टाकत आहेत. त्यासाठी जनतेलाही नियम पाळत सहकार्य करण्य आवाहन पेडणेकर यांनी केले आहे.
12:11 April 04
मुख्ममंत्र्यांनी बोलवली मंत्रिमंडळाची तातडीची बैठक; लॉकडाऊनबाबत निर्णय होण्याची शक्यता
कोरोनारुग्णांच्या वाढत्या संख्येवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (रविवार) राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. दुपारी ३ वाजता ऑनलाईन पद्धतीने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
11:52 April 04
मुख्यमंत्री उद्योजक, चित्रपट-मालिका निर्मात्यांशी साधणार संवाद; मिनी लॉकडाऊनवर करणार चर्चा
मुंबई :महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रूग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 12 वाजता चित्रपट, मालिका निर्मात्यांसमवेत बैठक बोलावली आहे. तर दुपारी 1 वाजता प्रमुख उद्योजकांसमवेत बैठक होणार आहे. ही बैठक ऑनलाईन होणार आहे. या बैठकीत मिनी लॉकडाऊनबाबत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीत नक्की काय चर्चा होणार? याकडे लक्ष लागले आहे.