मुंबई -देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांची सरकारने चालवलेली हेळसांड निंदनीय असल्याचे म्हणत काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला. राज्यातील साडे सहाशेहून अधिक जवानांची कुटुंबे जमिनीपासून वंचित आहेत. हक्काच्या जमिनीसाठी वीरमरण आलेल्या जवानांची कुटुंबे सरकार दरबारी हेलपाटे घालत असल्याचे काँग्रेसकडून ट्विट करून म्हटले आहे.
देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांच्या कुटुंबाची सरकारकडून हेळसांड - काँग्रेस
देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांची सरकारने चालवलेली हेळसांड निंदनीय असल्याचे म्हणत काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला.
सरकार एकीकडे सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करते आणि दुसरीकडे अंमलबजावणीच्या नावाने मात्र बोंबाबोंब. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांची सरकारने हेळसांड चालवली आहे. त्यांचे कुटुंबीय हक्काच्या जमिनीसाठी सरकार दरबारी हेलपाटे घातल आहेत. ही घटना भाजप सरकारच्या सैन्यावरील बेडगी प्रेमाचा पर्दाफाश करणारी असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी उभारलेल्या रुग्णालयांकडे सरकारचे अजिबात लक्ष नाही. रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्यामुळे अनेक सेवा कक्ष बंद पडले असून कामगार रुग्णांची उपचारावाचून हेळसांड होते आहे. या भाजप सरकारला कामगारांच्या आरोग्याचे काहीच देणेघेणे नाही का? असा सवालही काँग्रेसने केला आहे.