मुंबई - शेतकरी प्रश्नावरुन महाराष्ट्र काँग्रेसने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मागच्या फडणीस सरकारकने शेतकऱ्यांसाठी ५ हजार ३८० कोटींच्या मदतीची फसवी घोषणा केल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. तसेच पुन्हा आले अन् चुना लावून गेले असेही काँग्रेसने म्हटले आहे.
मी पुन्हा येईन, पुन्हा येईन म्हणून बसलाय घसा तरी खोटं बोलायचा चालवतायत वसा!असे काँग्रेसचे फडणवीस यांच्याबाबत विधान केले आहे. फसवण्यात धुरंधर, बोलण्यात पोपट, मोदींच्या पावलांवर पाऊल टाकत लांबच लांब फेकणाऱ्या फसणवीसांचा काळा कारनामा उघड केल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ५ हजार ३८० कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. मात्र, ही घोषणा उसवी असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. रात्रीच्या अंधारात यायचं आणि टेपा लावून जायचं, असे म्हणत फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्र काँग्रेसची फडणवीस यांच्यावर टीका हेही वाचा - सरकारने शेतकऱ्यांच्याही नाईट लाईफची चिंता करावी, फडणवीस यांचे सरकारला आवाहन हेही वाचा - 'जनतेची कामे तातडीने झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करा नाहीतर...'
कालच (शुक्रवार) फडणवीस यांनी परभणीत बोलताना महाविकास आघाडीच्या सरकारने मुंबईच्या नाईट लाईफची चिंता केली आहे. मात्र, तशी चिंता त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या नाईटलाइफचीही करायला हवी. शेतकऱ्यांना रात्रभर जागून पिकांना पाणी द्यावे लागते. त्यामुळे सरकारने दिवसा वीज कशी देता येईल, याचे नियोजन करावे, असे वक्तव्य केले होते. तसेच नव्या सरकारला जर काही अडचणी असतील तर त्यांनी नक्की सांगाव्या आम्ही त्यांना पूर्ण मदत करायला तयार असल्याचे वक्तव्य केले होते. तसेच, मराठवाड्याच्या पुढच्या पिढीने दुष्काळ पाहू नये, हे स्वप्न आम्ही पाहिले होते. तशी कृतीही केल्याचे फाडणवीस म्हणाले होते. या पार्श्वभूमिवर काँग्रेसने ट्वीट करुन फडणवीस यांच्यावर आज निशाणा साधला आहे.