महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पूरग्रस्तांना अमिताभ बच्चन, रिलायन्सची मोठी मदत; मुख्यमंत्र्यांनी मानले आभार - सांगली पूर

प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन आणि रिलायन्स ग्रुपकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत निधी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर बच्चन आणि रिलायन्स ग्रुपचे आभार मानले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By

Published : Aug 19, 2019, 4:31 PM IST

मुंबई - राज्यातील विविध भागात विशेषत: सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. जीवितहानीसोबतच वित्तहानीही मोठी झाली आहे. शेतीचे नुकसान झाले असून जनावरेही मोठ्या प्रमाणात दगावली आहेत. व्यापारी, उद्योजकांनाही पुराचा फटका बसला आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सध्या अनेक हात पुढे येत आहेत. प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन आणि रिलायन्स ग्रुपकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत निधी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर बच्चन आणि रिलायन्स ग्रुपचे आभार मानले आहेत.

रिलायन्स समूहाने ५ कोटी तर अमिताभ बच्चन यांनी ५१ लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केले आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून अमिताभ बच्चन आणि रिलायन्स ग्रुपचे आभार मानले आहेत. 'धन्यवाद अमिताभजी तुम्ही पुढाकार घेऊन मदत दिलीत, यातून सांगली, कोल्हापूर, सातारा येथील पूरग्रस्तांना मदत, पुनर्वसन करताना आम्हाला प्रेरणा मिळेल. ५ कोटींची मदत दिल्याबद्दल रिलायन्स समूहाचे आभार', असे मुख्यमंत्र्यांनी दोन वेगवेगळे ट्विट करून आभार मानले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details