महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Breaking News : औरंगाबादला कृषी विद्यापीठ फक्त फडणवीस आणू शकतात, राष्ट्रवादी आमदाराला विश्वास - Marathi online news updat

Maharashtra Breaking news
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

By

Published : Nov 17, 2022, 6:19 AM IST

Updated : Nov 17, 2022, 10:06 PM IST

22:05 November 17

औरंगाबादला कृषी विद्यापीठ फक्त फडणवीस आणू शकतात, राष्ट्रवादी आमदाराला विश्वास

औरंगाबाद -राष्ट्रवादी आमदारांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काम करतील असा विश्वास असल्याचं दिसून आले. राष्ट्रवादी आ सतीश चव्हाण यांनी आपल्या भाषणात औरंगाबादेत कृषी विद्यापीठ देवेंद्र फडणवीस च आणू शकतात त्यासाठी माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पाठपुरावा करावा अस ते म्हणाले. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे..

20:52 November 17

अजित पवारांविरोधात अण्णा हजारेंची मुंबई सत्र न्यायालयात याचिका

अजित पवारांविरोधात अण्णा हजारेंची मुंबई सत्र न्यायालयात याचिका

सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे पुन्हा सक्रिय

अजित पवारांविरोधात अण्णा हजारे मुंबई सत्र न्यायालयात

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कथित 25 हजार कोटींचा घोटाळा प्रकरणाची उद्या मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी

वरिष्ठ वकील सतीश तळेकर हे कोर्टात मांडणार आहेत अण्णा हजारेंची बाजू

अजित पवारांविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी

मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याची 2 वर्षां नंतर पुन्हा करायची आहे चौकशी

18:50 November 17

स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतनात दुप्पट करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई -राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतन दुप्पटीने वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे आता स्वातंत्र्य सैनिकांना १० हजार रुपयांऐवजी दरमहा २० हजार रुपये निवृत्ती वेतन मिळेल. भारतीय स्वातंत्र्य संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्राम व गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांना याचा लाभ मिळणार असल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

18:33 November 17

राहुल गांधी यांच्या विरोधात दादर पोलिसात तक्रार दाखल

महाराष्ट्रातील जाहीर सभेत वीर सावरकरांचा अपमान केल्याबद्दल काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात दादर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. राहुल गांधी म्हणाले होते की, वीर सावरकरांनी पेन्शन घेतली आणि ब्रिटिशांसाठी काम केले आणि त्यांनी देशाविरुद्धही काम केले. त्याविरोधात वीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी तक्रार दाखल केली.

18:28 November 17

राहुल गांधी यांनी सावरकर यांच्या विरोधात वक्तव्य केल्याच्या विरोधात मनसे ही आता आक्रमक

ठाणे - राहुल गांधी यांनी सावरकर यांच्या विरोधात वक्तव्य केल्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक. मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी

18:08 November 17

मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोन चोरट्यांना बेदम चोप

ठाणे - तरुणाच्या हातातून मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोन चोरट्यांना नागरिकांनी पाठलाग करून बेदम चोपले, दोन्ही चोरट्यांना अटक करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यात ही घटना घडली.

17:33 November 17

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट मधील फळ बाजारात भीषण आग

नवी मुंबई -नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील फळ बाजारात मोठी आग लागली आहे. याआगीत 15 ते 20 गाळे जळाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तीन अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याआगीत जीवितहानी झाली की नाही याची माहिती मात्र अजून समोर आलेली नाही.

17:14 November 17

पुण्यात वडील, आजोबा आणि काकाकडून सहा वर्षांपासून विनयभंग आणि लैंगिक शोषण, गुन्हा दाखल

पुणे -एका 17 वर्षांच्या महाविद्यालयीन मुलीने आरोप केला आहे की तिचे वडील, आजोबा आणि काका गेल्या सहा वर्षांपासून वेगवेगळ्या प्रसंगी तिचा विनयभंग आणि लैंगिक शोषण करत आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने IPC आणि POCSO कायद्याच्या कलम 376 आणि 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ही माहिती दिली.

16:55 November 17

श्रद्धा हत्याकांड प्रकरण - आरोपी आफताबला उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात चौकशीसाठी नेणार

नवी दिल्ली -श्रद्धा हत्याकांड प्रकरणी आरोपी आफताबला उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश येथे चौकशीसाठी नेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी न्यायालयात निवेदन सादर केले. आरोपी आफताबच्या नार्को विश्लेषण चाचणीसाठी परवानगी मागणाऱ्या पोलिसांच्या अर्जालाही न्यायालयाने परवानगी दिली.

16:39 November 17

मुंबईत खंडणी विरोधी सेलने एकूण 5 क्रिकेट बुकींना केली अटक

मुंबई - क्राइम ब्रँचच्या खंडणी विरोधी सेलने एकूण 5 बुकींना अटक केली आहे. यापूर्वी माटुंगा परिसरातून दोन क्रिकेट बुकींना अटक करण्यात आली होती. आता आणखी तीन बुकींना अटक करण्यात आली आहे. पोलीस आज या 5 बुकींना न्यायालयात हजर करणार आहेत.

16:15 November 17

श्रद्धा खून प्रकरणी आरोपी आफताब पूनावाला याची आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजेरी

नवी दिल्ली - श्रद्धा खून प्रकरणी केसची सुरक्षा आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन आरोपी आफताब पूनावाला याच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होण्याच्या अर्जाला परवानगी देण्यात आली. आता त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर केले जाणार आहे.

16:08 November 17

राहुल गांधी समजून सावरकरांच्या प्रतिमेला चप्पल मारण्याचा प्रयत्न

पुणे - राहुल गांधी समजून सावरकरांच्या प्रतिमेला चप्पल मारण्याचा प्रयत्न. शिंदे गटातील महिलेचा आंदोलनादरम्यान गोंधळ. पुण्यात राहुल गांधी यांच्या विरोधात सुरू होते आंदोलन.

16:04 November 17

श्रद्धा हत्या प्रकरण - शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात

पालघर - शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात दाखल. श्रद्धा वाळकर हत्या प्रकरणात घेतली पोलिसांची भेट. ताबडतोबीने योग्य ती कारवाई करण्याचे दिले निर्देश

15:59 November 17

मंत्रालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई - मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न एका तरुणाने केला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी येथील बापू नारायण मोकाशी या तरुणाने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षततेसाठी लावण्यात आलेल्या जाळीमुळे सदर तरुणाचा जीव वाचला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

15:51 November 17

सावरकर यांच्याबाबत राहुल गांधींच्या वक्तव्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निषेध

मुंबई -राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निषेध करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात निषेध प्रस्ताव मांडला. मंत्रिमंडळ बैठकीत राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसार माध्यमांना याची माहिती दिली.

15:33 November 17

महाराष्ट्रातील महिलांचा ओमानमध्ये होतोय छळ मदतीची राष्ट्रीय महिला आयोगाकडे मागणी

मुंबई -महाराष्ट्रातील महिलांचा ओमानमध्ये होतोय छळ. राज्य महिला आयोगाने राष्ट्रीय महिला आयोगाकडे केली महिलांना तात्काळ मदत करण्याची मागणी.

14:52 November 17

विनायक मेटे यांच्या चालकाला अटक

विनायक मेटे यांच्या चालकाला अटक केली आहे. त्याच्यावर कालच सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज त्याला अटक करण्यात आली आहे. गाडी ओव्हरटेक करता येणार नाही हे चालक एकनाथ कदमच्या लक्षात आले होते असे सकृत दर्शनी दिसते. मात्र त्याने कार तशीच दामटली. त्यामुळे डाव्याबाजूला धक्का बसला आणि हा भीषण अपघात झाला. सीआयडीच्या तपासात ही बाब उघडकीस आली आहे. त्यानंतररसायनी पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

13:48 November 17

भारतामध्ये गेल्या 8 वर्षापासून भीतीचे वातारण - नेते राहुल गांधी

जालना - भारतामध्ये गेल्या 8 वर्षापासून भीतीचे वातारण आहे. भाजपचे नेते शेतकरी, बेरोजगारी यावर बोलत नाहीत. असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ते भारत जोडो यात्रेदरम्यान पत्रकार परिषदेत बोलत होते.

13:00 November 17

श्रद्धाची ओळख लपवण्यासाठी तिचा चेहरा जाळला - आफताब

नवी दिल्ली - श्रद्धा खून प्रकरणी आरोपी आफताबने पोलिसांसमोर कबुली दिली की श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर तिची ओळख लपवण्यासाठी तिचा चेहरा जाळला. हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे मार्ग त्याने इंटरनेटवर शोधल्याची कबुलीही त्याने दिली आहे. दिल्ली पोलिस सूत्रांनी ही माहिती दिली.

12:43 November 17

राहुल गांधी यांनी सावरकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध ठाण्यात निषेध

ठाणे- राहुल गांधी यांनी सावरकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करत ठाण्यातील बाळासाहेबांची शिवसेना आक्रमक. माजी महापौर नरेश म्हस्के आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वात राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. महिला पदाधिकारीदेखील झाल्या आक्रमक.

12:06 November 17

अभिनेत्री रिया सेन काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रेत सहभागी

जालना - अभिनेत्री रिया सेन आज काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रेत सामील झाल्या. पक्षाचे खासदार राहुल गांधी आणि इतरांनी आज परतूर येथून महाराष्ट्र यात्रेला सुरुवात केली.

12:01 November 17

सावरकरांबद्दलच्या कथित वक्तव्यावरुन राहुल गांधींचा नाशिकमध्ये निषेध

नाशिक -राहुल गांधी यांचा नाशिकमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल काढलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला कार्यकर्त्याही उपस्थित होत्या.

11:58 November 17

कोथरुडच्या श्रावणधारा सोसायटीत आग, बचावकार्य सुरू

पुणे - कोथरुड, आशिष गार्डन जवळ, श्रावणधारा सोसायटीत आगीची घटना. अग्निशमन दलाच्या ५ फायरगाड्या व १ वॉटर टँकर रवाना. आग विझवण्याचे काम सुरू

11:56 November 17

उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल

मुंबई - उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना केले अभिवादन. रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे उपस्थित. थोड्याचवेळात बाळासाहेबांच्या व्यंगचित्र प्रदर्शनाची पाहणी करणार.

11:53 November 17

मुंबई प्रभाग रचनेवरील याचिकेवर राज्य सरकारला उत्तर देण्याचे हायकोर्टाचे निर्देश

मुंबई - महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेवरील याचिकेवर राज्य सरकारला उत्तर सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश. उद्धव ठाकरे यांच्या सरकारने महापालिका प्रभाग संख्या 236 केली होती. हा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने रद्द करत पूर्वीची 227 प्रभाग रचना कायम केली आहे. याविरोधात ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकावर न्यायमूर्ती गौतम पाटील आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी महापालिका आणि राज्य सरकारला 25 नोव्हेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या याचिकेवर पुढील सुनावणी 29 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

11:45 November 17

रोहित्राच्या वीज बिलावरून झालेल्या वादात एकाचा खून

हिंगोली - शेतात सार्वजनिक असलेल्या रोहित्राच्या वीज बिलावरून झालेल्या वादात एकाचा खून झाल्याची घटना हिंगोली तालुक्यातील बासंबा येथे बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. गजानन गणपत घुगे (40) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

10:20 November 17

नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे म्हैसूर सिटी कॉर्पोरेशनला नोटीस

नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) ने म्हैसूर सिटी कॉर्पोरेशनला कर्नाटकातील म्हैसूर येथील बस स्टॉपवर "वादग्रस्त प्रकारचे मुद्दे झाल्याने बांधलेली रचना" काढून टाकण्यासाठी नोटीस जारी केली; संरचना काढून टाकण्यासाठी त्यांना एक आठवड्याचा वेळ देतो.

10:01 November 17

बाळासाहेंबाच्या विचाराची मशाल ही केवळ निष्ठावंताच्या हातात असणार- संजय राऊत

बाळासाहेंबाच्या विचाराची मशाल ही केवळ निष्ठावंताच्या हातात असणार आहे. त्यांनी निष्ठा आणि अस्मितेला तेज प्राप्त करून दिले. त्यांना जाऊन १० वर्षे जाऊन झाले. आज त्यांच्या नावाने ढोंग सुरू आहे. हे ढोंग चालणार नाही, त्याला लाथ मारुन पुढे चालले पाहिजे. बाळासाहेबांचे वारसदार सांगून जनतेला दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे.

09:56 November 17

आरोपी आफताब पूनावाला याला पोलीस दिल्लीतील साकेत न्यायालयात करणार हजर

श्रद्धा खून प्रकरणात दिल्ली पोलीस आज आरोपी आफताब पूनावाला याला साकेत न्यायालयात हजर करणार असून त्याच्या पुढील कोठडीची मागणी करणार आहेत. पोलिस सर्व पुरावे गोळा करत आहेत. त्यांना माहिती मिळाली आहे की आफताब-श्रद्धा यांचे 300 रुपये पाणी बिल थकित असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिले. खून झाल्यानंतर स्वच्छतेसाठी पाण्याचा खूप वापर झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

09:18 November 17

आझम खान यांची द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली

समाजवादी पक्षाचे (एसपी) नेते आझम खान यांची द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली. खान यांनी 2019 च्या खटल्याच्या सुनावणीला स्थगिती मिळावी यासाठी याचिका दाखल केली होती. रामपूर Spl कोर्टाने ऑक्टोबर 2022 मध्ये त्याला या प्रकरणात दोषी ठरवले होते आणि त्याला 3 वर्षांची शिक्षा सुनावली होती.

08:19 November 17

येरवडा दुहेरी खून प्रकरणात माजी नगरसेविकेचा सासरा, दिरासह अकरा आरोपींना अटक

पुणे :- येरवडा येथे पूर्व वैमनस्यातून 13 जणांनी पूर्व नियोजन करून दोघांचा खून केल्याची घटना घटना शनिवारी 12 नोव्हेंबर रोजी पहाटे घडली होती. यात सुभाष उर्फ पापा किसन राठोड (वय 40), अनिल उर्फ पोपट भिमराव वाल्हेकर (वय 35, रा. लमाण तांडा, येरवडा) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. या खून प्रकरणातील 11 आरोपींना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे.

06:56 November 17

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा अकोल्यातील पातूर येथून पुन्हा सुरू

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह अकोल्यातील पातूर येथून भारत जोडो यात्रा पुन्हा सुरू केली आहे.

06:22 November 17

जो बायडेन यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याचे केले ट्विट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इंडोनेशियातील बाली येथे जी २० शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांच्या भेटीबद्दल ट्विट केले. जागतिक आर्थिक सहकार्याचे प्रमुख मंच म्हणून G20 साठी वचनबद्ध असल्याचे बायडेन यांनी म्हटले.

06:08 November 17

Maharashtra Breaking news नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे म्हैसूर सिटी कॉर्पोरेशनला नोटीस

मुंबई : मुख्यमंत्री शिंदे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवतीर्थावर जाऊन अभिवादन केले. मुख्यमंत्र्यांच्या अभिवादानंतर ठाकरे गटाकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं गोमूत्र शिंपडत शुद्धीकरण करण्यात आले. शिंदे गटाविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधीना जाऊन मिठी मारणाऱ्या आदित्य ठाकरेंचं शुद्धीकरण नक्की कसं करणार..? असा सवाल बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी विचारला आहे.

Last Updated : Nov 17, 2022, 10:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details