महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

BREAKING : टोकियो ऑलिम्पिक - लवलिनाचा विजय प्रतिभा आणि नारी शक्तीच्या दृढतेची साक्ष; मोदींनी साधला लवलिनाशी संवाद - undefined

maharasthra breaking
महाराष्ट्र ब्रेकिंग

By

Published : Aug 4, 2021, 6:50 AM IST

Updated : Aug 4, 2021, 1:14 PM IST

13:04 August 04

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लवलिना बोर्गोहेन हिच्याशी संवाद साधला आणि कांस्य जिंकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधानांनी तिला सांगितले की, तिचा विजय प्रतिभा आणि आमच्या नारी शक्तीच्या दृढतेची साक्ष आहे. ते असेही म्हणाले की, तिचे यश प्रत्येक भारतीयांसाठी, विशेषत: आसाम आणि ईशान्यसाठी खूप अभिमानाची बाब आहे.

11:47 August 04

पंतप्रधान मोदींकडून लवलिनाला पुढील प्रयत्नांसाठी शुभेच्छा. पंतप्रधान मोदी म्हणाले, "लवलीनाने चांगली लढत दिली. बॉक्सिंग रिंगमध्ये तिचे यश अनेक भारतीयांना प्रेरणा देते. तिची जिद्द आणि जिद्द वाखाणण्याजोगी आहे. कांस्य जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन. तिच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा".

11:47 August 04

टोकियो - भारतीय महिला बॉक्सिंगपटू लवलिका बोर्गोहेन हिचे सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगले आहे. उपांत्य फेरीत लवलिनाचा टर्कीच्या बुसेनाझ सुर्मेनेली हिने पराभव केला. या पराभवामुळे लवलिनाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. दरम्यान, हे भारताचे तिसरे पदक आहे. याआधी मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य तर पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटन महिला एकेरीत कांस्य पदक जिंकलं आहे.

09:49 August 04

टोकियो ऑलिम्पिक 2020 : भारतीय कुस्तीपटू दीपक पुनियाचा उपांत्य फेरीत प्रवेश 

09:42 August 04

टोकियो ऑलिम्पिक 2020 : भारतीय कुस्तीपटू रवि दहियाचा उंपात्य फेरीत प्रवेश

09:42 August 04

सेंसेक्सची 382.19 पॉइंट्सने वाढला; सध्याची स्थिती 54,205.55

09:11 August 04

टोकियो ऑलिम्पिक 2020 : भारतीय कुस्तीपटू दीपक पुनियाने पुरुषांच्या फ्रीस्टाइल 86 किलो वजनगटात नायजेरियाच्या Ekerekeme Agiomor याचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला

09:05 August 04

मुंबई उच्च न्यायालय एल्गार परिषदेतील आरोपी सुधा भारद्वाज यांच्या जामिन याचिकेवरील सुनावणी संपवण्याची शक्यता आहे. एएसजी अनिल सिंग यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) युक्तिवाद संपवला. तर एजी आशुतोष कुंभकोणी यांनी महाराष्ट्र शासनाकडून आपला युक्तिवाद पूर्ण केला आहे.

08:40 August 04

अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्येच्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आणखी 30 दिवसांची वेळ मागितली आहे. एनआयएने विशेष न्यायालयाला सांगितले की, अँटिलिया बॉम्बच्या प्रकरणानंतर मनसुख हिरेनला संपवण्यासाठी आरोपींना 45 लाख रुपये दिले गेले होते.

08:38 August 04

टोकियो ऑलिम्पिक 2020 : भारतीय कुस्तीपटू रवि दहियाने 57 किलो वजनगटात क्वार्टर फाइनल मध्ये जागा बनवली. त्याने कोलंबियाच्या एदुआर्दो टाइगरेरोस 13-2ने हरवले.

07:58 August 04

सक्तवसूली संचलनालयाने (ईडी) अवंथा समूहाचे प्रवर्तक गौतम थापर यांना मनी लाँडरिंग प्रकरणात अटक केली आहे. काल (मंगळवारी) त्यांच्या मुंबई आणि दिल्लीतील विविध ठिकाणी छापा टाकण्यात आला होता. यानंतर त्यांना ईडीने अटक केली. 

06:42 August 04

टोकियो ऑलिम्पिक 2020 : भारताच्या नीरज चोप्राने पुरुष भालाफेकमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 

06:14 August 04

मुंबई - कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत पठानवाडी परिसरात केबल कारखान्यामध्ये भीषण आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे टीम रवाना झाली आहे. कुरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आजूबाजूच्या दुकानांना खाली करण्यात येत आहे. ही दुसऱ्या स्तराची आग आहे. दरम्यान, सुदैवाने आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

Last Updated : Aug 4, 2021, 1:14 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details