मुंबई - महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते आणि माजी नगरसेवक योगेश भोईर यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एका अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. चौकशीनंतर भोईर यांच्याविरुद्ध एफआयआर शनिवारी नोंदवण्यात आला, असे अधिकाऱ्याने सांगितले. एसीबीच्या म्हणण्यानुसार, भोईर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक असताना 85.56 लाख रुपयांची मालमत्ता जमवली होती. जी त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा 449 टक्क्यांनी जास्त होती.
Breaking News : माजी नगरसेवक योगेश भोईर यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल - holi celebration in Maharashtra
20:00 March 06
उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक योगेश भोईर यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल
19:52 March 06
मुंबईत ५२ लाख रुपये किमतीच्या हेरॉईन आणि मेफेड्रोनसह एकाला अटक
मुंबई - मालाडच्या पश्चिम उपनगरात 52 लाख रुपये किमतीचे हेरॉईन आणि मेफेड्रोन बाळगल्याप्रकरणी एका 48 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आज ही माहिती दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाने शनिवारी मालवणी गावाजवळ आरोपीला अडवले. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून त्याला पकडले.
19:47 March 06
बीडमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची प्रतिकात्मक होळी
बीड - शहरामध्ये अनोखी होळी साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे तंबाखूजन्य पदार्थांची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय बीड, समाज कल्याण अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बीड यांच्या संयुक्त विद्यमाने ही होळी करण्यात आली. बीड शहरातील संस्कृती विद्यालय या शाळेच्या प्रांगणात तंबाखूजन्य पदार्थांची प्रतिकात्मक होळी करण्यात आली.
19:32 March 06
पुण्यात अवकाळी मुसळधार पाऊस
पुणे - शहरात मुसळधार पाऊस. अवेळी पाऊस आल्याने लोकांची तारांबळ. एकदमच आभाळ येऊन पावसाला झाली सुरूवात. मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने सखल भागात साठले पाणी.
17:37 March 06
ईडीची नागपूर-मुंबईतील 15 ठिकाणी शोध आणि सर्वेक्षण मोहीम, मोठे घबाड हाती
नागपूर - पंकज मेहाडिया, लोकेश आणि कथिक जैन यांच्या गुंतवणुकीच्या फसवणुकीसंदर्भात ईडीने नागपूर आणि मुंबईतील 15 ठिकाणी शोध आणि सर्वेक्षण केले आहे. 5.51 कोटी रुपयांचे बेहिशेबी दागिने आणि 1.21 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
15:07 March 06
मुंबई आयआयटी आत्महत्या प्रकरण- जातीवरुन गैरवागणूक नाही तर मार्क कमी पडल्याने आत्महत्या, अहवालात निष्कर्ष
मुंबई - आयआयटी बाँबेमधील विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणी अंतर्गत अहवाल मिळाला आहे. त्यानुसार त्याच्या आत्महत्येमागे जातीय दृष्टीकोण नसल्याचे दिसून आले आहे. त्याला मार्क कमी पडल्याने त्याने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष या समितीने काढला आहे.
14:58 March 06
परीक्षा केंद्रावर कॉपीवरून पालक शिक्षकांमध्ये वाद
औरंगाबाद - कॉपी देण्यावरून परीक्षा केंद्रावर पालक-शिक्षकांमध्ये वाद झाला. गंगापूर शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा प्रकार दिसून आला आहे. कॉपीमुक्त अभियानाला हरताळ. कॉपी देण्यासाठी काही पालक परीक्षा केंद्रामध्ये घुसल्यावरून हा वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. या वादाचा एक व्हिडिओही समोर आला आहे.
14:55 March 06
नाशिकच्या काही भागात अवकाळी पावसाचा तडाखा
नाशिक - शहर आणि जिल्ह्याच्या काही भागात सोमवारी मुसळधार अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोमवारी मध्यरात्रीनंतर जोरदार वारा, गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. तर काही भागात गारांसह पाऊस झाला, असे सांगण्यात आले.
14:47 March 06
तोशाखाना प्रकरणी इम्रान खान यांच्या याचिकेवर कोर्टाने निकाल ठेवला राखून
इस्लामाबाद - येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) प्रमुख आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या निलंबनाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला आहे. तोशाखाना प्रकरणात जामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आले आहे. आजच्या सुनावणीत खान यांचे वकील अली बुखारी, कैसर इमाम आणि गोहर अली खान कोर्टात हजर झाले. बुखारी यांनी दावा केला की त्यांच्या अशिलाने नेहमीच न्यायालयाच्या आदेशांचे पालन केले आहे.
14:37 March 06
पाकिस्तानमध्ये बोलान आत्मघाती स्फोटात 9 सुरक्षा जवान शहीद
बलुचिस्तान - बोलानमध्ये झालेल्या आत्मघाती बॉम्ब हल्ल्यात बलुचिस्तान कॉन्स्टेब्युलरीचे किमान नऊ जवान ठार झाले. अन्य नऊ जण जखमी झाले, असे जिओ न्यूजने वृत्त दिले आहे. कच्छीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) मेहमूद नोटझाई यांनी सांगितले की, प्राथमिक पुराव्यांवरून हा आत्मघातकी हल्ला होता, तथापि, स्फोटाचे नेमके स्वरूप तपासानंतर कळू शकेल.
14:32 March 06
मनीष सिसोदिया यांना 20 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी
नवी दिल्ली - लिकर धोरण प्रकरणी दिल्लीच्या कोर्टाने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आप नेते मनीष सिसोदिया यांना 20 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
14:05 March 06
औरंगजेबाचे फोटो झळकवणे हा देशद्रोहापलिकडचा गुन्हा - रावसाहेब दानवे
जालना - औरंगजेबाचे फोटो झळकवणे हा देशद्रोहापलिकडचा गुन्हा असल्याचे म्हणत फोटो झळकावणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी केली आहे. जनसामान्यांची भावना लक्षात घेवून आमच्या सरकारने औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर हे नाव दिले आहे. त्यामुळे कुणी हे अशा प्रकारचे पोस्टर्स झळकावले त्याचा निषेध करतो. हा देशद्रोहापलिकडचा गुन्हा आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी असे दानवेंनी म्हटले आहे. तीन राज्यात आम्ही जिंकलो असून निराशेपोटी विरोधीपक्ष तपास यंत्रणेवर खापर फोडत असल्याचेही दानवेंनी म्हंटलंय.
13:38 March 06
होळी, धुलीवंदनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभेच्छा
मुंबई - राज्यपाल रमेश बैस यांनी होळी तसेच धुलीवंदनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. परस्पर प्रेम, स्नेह व बंधुभावाचे प्रतिक असलेला रंगांचा हा सण सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरो व देशबांधवांमध्ये असलेली नात्यांची वीण अधिक घट्ट करो, या शुभकामनेसह सर्वांना होळी व धूलिवंदनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. होळी व रंगोत्सव साजरा करताना पर्यावरण रक्षणाबद्दल जागरुक राहण्याचे आवाहन करतो, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
12:14 March 06
यूपीत रामदास आठवले भाजपसोबत निवडणूक लढणार, 4 जागा मागितल्या
लखनऊ - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी उत्तर प्रदेशमध्ये भाजपसोबत निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. त्यांनी भाजपला यूपीमध्ये 4 जागा मागितल्या आहेत. त्या ठिकाणी ते मुस्लिम आणि दलित उमेदवार उभे करणार आहेत. याबाबत त्यांनी भाजपअध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबतच मुख्मंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशीही चर्चा केली आहे.
12:01 March 06
लोकसभा आणि विधानसभेत आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहणार - शरद पवार
पुणे - राज्यातील जनतेला बदल हवा आहे, हे कसब्याच्या पोटनिवडणुकीतील निकालावरुन दिसते. त्यामुळेच यापुढेही लोकसभा आणि विधानसभेत आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहू, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मांडले आहे.
11:52 March 06
नोकरीसाठी जमीन प्रकरणी सीबीआय अधिकारी राबडी देवींच्या निवासस्थानी दाखल
पाटणा - नोकरीसाठी जमीन प्रकरणाच्या संदर्भात सीबीआयचे अधिकारी बिहारमधील पाटणा येथील राबडी देवींच्या निवासस्थानी धडक दिली. यावेळी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.
11:22 March 06
मुंबई पोलिसांच्या वसाहतीत सिलिंग कोसळून चार जखमी
मुंबई - ताडदेव येथे मुंबई पोलिसांची वसाहत आहे. या वसाहती मधील एका इमारतीमधील चौथ्या माळ्यावरील सिलिंग मध्यरात्री 2.30 च्या दरम्यान कोसळले. या दुर्घटनेत एकाच घरातील चार जण जखमी झाले. या जखमींना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले, या चारही जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या दुर्घटनेत नामदेव सानप 57 वर्ष, विना सानप 50 वर्ष, स्नेहल सानप 25 वर्ष वेदांत सानप 17 वर्ष हे जखमी झाले आहेत.
11:06 March 06
होय विकासासाठी खोके मिळत आहेत-रामदास कदम
उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये सभा घेतल्यानंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदम कमालीचे आक्रमक झाले आहेत. ठाकरेंचे हात भ्रष्टाचाराने बरबटल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. उद्धव ठाकरे १०० वेळा आले तरी योगेश कदम पडणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
11:06 March 06
जनता सरकारच्या नावाने शिमगा करत आहे-संजय राऊत
सरकारविरोधात बोलणे गुन्हा ठरत आहे. जनताच सरकारच्या नावाने शिमगा करत असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
10:06 March 06
भाजपच्या गडाला धंगेकरांनी सुरुंग लावला- शरद पवार
भाजपच्या गडाला धंगेकरांनी सुरुंग लावल्याचा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला लगावला आहे.
10:05 March 06
शुटिंगदरम्यान अमिताभ बच्चन जखमी
हैदराबादला शुटिंगदरम्यान अमिताभ बच्चन जखमी झाले आहेत. त्यांच्या बरगड्यांना जखम झाली आहे.
09:55 March 06
आप नेत्यांच्या अटकेवरून काँग्रेसची दिल्लीत पोस्टरबाजी
दिल्ली काँग्रेसने मुख्यालयाबाहेर आणि दिल्ली काँग्रेस कार्यालयाबाहेर आपचे नेते मनीष सिसोदिया-सत्येंद्र जैन यांच्या अटकेवर पोस्टर लावले आहेत. जे भ्रष्टाचारी आहेत, तेच देशद्रोही आहेत, असे पोस्टरमध्ये लिहून काँग्रेसने आपवर निशाणा साधला आहे. सिसोदिया यांना सीबीआयने अबकारी धोरण प्रकरणात फेब्रुवारीमध्ये अटक केली होती. जैन यांना 2022 मध्ये कोलकाता येथील कंपनीशी संबंधित हवाला व्यवहाराच्या प्रकरणात ईडीने अटक केली होती.
08:48 March 06
नाशिक शहर व जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका
नाशिक शहर व जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. रात्रभर जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे. अवकाळी पावसामुळे गोवऱ्या विक्रेत्यांचे मोठ नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनाही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.
07:50 March 06
उत्तर प्रदेश पोलिसांचे आणखी एक एन्काउन्टर, आरोपीला चकमकीत केले ठार
उमेश पाल खून प्रकरणात मोठी अपडेट आहे. प्रयागराजमधील कौंधियारा पोलीस स्टेशन परिसरात पोलीस आणि आरोपी विजय उर्फ उस्मान चौधरी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत उमेश पालवर गोळीबार करणारा आरोपी उस्मान चौधरी ठार झाला आहे.
07:09 March 06
जत्रेत सहभागी होण्यासाठी गेलेल्या महिलेवर 7 जणांचा सामूहिक बलात्कार
मावळीपदाच्या जत्रेत सहभागी होण्यासाठी गेलेल्या महिलेवर 7 जणांनी सामूहिक बलात्कार केला. 7 आरोपींपैकी एका अल्पवयीन आरोपीसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी शोध सुरू असल्याचे बस्तरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक निवेदिता पाल यांनी सांगितले.
07:08 March 06
जॉर्जियामध्ये झालेल्या गोळीबारात दोन जण ठार
अमेरिकेत सार्वजनिक ठिकाणी पुन्हा एकदा गोळीबार झाला आहे. जॉर्जियामध्ये झालेल्या गोळीबारात दोन जण ठार झाले, तर इतर सहा जण जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
06:52 March 06
Maharashtra Breaking News : आम्ही आरोपांना विकासकामे करून उत्तर देऊ-एकनाथ शिंदे
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी स्वतःमध्ये पाहिले पाहिजे. त्यांची जागा वेगळी होती, नाहीतर त्याचे शब्द आणि आरोप तेच होते. उद्या ते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणू शकतात. त्यांच्या आरोपांना आम्ही विकासकामे करून उत्तर देऊ, अशी मुख्यमंत्री एकनाथ यांनी उद्धव ठाकरे यांच्या खेडमधील भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे. पुढे मुख्यमंत्री म्हणाले, की आम्ही राज्याला पुढे नेऊ. जनता पाहत आहे आणि त्यांना विकास कामे हवी आहेत.