महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Breaking News : वकील प्रवीण चव्हाण यांच्याविरोधात खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल - Marathi online news

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
Maharashtra Breaking News

By

Published : Jan 16, 2023, 7:23 AM IST

Updated : Jan 16, 2023, 9:44 PM IST

21:43 January 16

वकील प्रवीण चव्हाण यांच्याविरोधात खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुणे :- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार च्या काळात पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकून आरोप करणाऱ्या सरकारी वकील यांच्यासह 2 जणांच्या विरोधात 1 कोटी 20 लाख रुपये घेतल्या प्रकरणी पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशन येथे खंडणी तसेच फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.

18:52 January 16

समृद्धी महामार्गावरील शिवनापिसा गावाजवळ दोन कारमध्ये अपघात; तीन जण ठार, दोन जखमी

बुलढाणा - जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील शिवना पिसा या गावाला जवळ उभे असलेल्या कारला पाठीमागून जाणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये तीन जण ठार तर 2 जण जबर जखमी झाले असून त्यांना मेहकर येथील रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे हा अपघात 16 जानेवारीच्या सकाळी घडलाय अपघातानंतर अपघात ग्रस्त वाहने समृद्धी मार्गावरून हटविण्यात आली आहे

18:39 January 16

ठाकरे गटातील नेत्यांची सिक्युरिटी काढल्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका

ठाकरे गटातील नेत्यांचे सिक्युरिटी काढल्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका

राज्य सरकारला यावर उत्तर दाखल करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी दाखल केली होती याचिका

राजन विचारे यांची सुरक्षा काढल्यानंतर याचिका दाखल केली होती

17:47 January 16

रस्त्यांच्या टेंडरसंदर्भात आदित्य ठाकरेंचे चहल यांना पत्र

मुंबई - शिवसेनानेते आदित्य ठाकरे यांनी बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना पत्र लिहिले आहे. त्यानी रस्त्यांच्या मेगा-टेंडर्सच्या कथित अनियमिततेशी संबंधित हे पत्र लिहिले आहे. त्याबाबत चौकशी करण्याची मागणी ठाकरे यांनी केली आहे.

17:45 January 16

महाबळेश्वर घाटात ब्रेक फेल झाल्याने टेम्पो दरीत कोसळला, तीन जण गंभीर जखमी

सातारा - महाबळेश्वर-तापोळा मार्गावरील घाटात मजुरांचा टेम्पो दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातानंतर याच मार्गावर आणखी एक भीषण अपघात झाला आहे. इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन निघालेल्या टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने टेम्पो चारशे फूट दरीत कोसळला. रविवारी रात्री झालेल्या या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

16:58 January 16

मुंबईची हार्बर रेल्वे सेवा ठप्प

मुंबईची हार्बर रेल्वे सेवा ठप्प

रे रोड स्थानकात ओव्हर हेड वायर मध्ये बिघाड झाल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.

रेल्वे प्रशासन दुरुस्तीचे काम केल्यावर पुन्हा सेवा सुरू केली जाईल रेल्वे प्रशासनाची माहिती

16:41 January 16

कोविड सेंटर वाटप प्रकरण; BMC आयुक्तांची ईडीकडून साडेतीन तास चौकशी

मुंबई - कोरोना काळामध्ये कोविड सेंटर वाटप प्रकरणात भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार भाजपनेते किरीट सोमय्या यांनी केली होती. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात ईडीने तपास सुरू केला असून आज मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांची साडेतीन तास चौकशी केली आहे. इक्बालसिंह चहल सकाळी 11.30 वाजता ईडी कार्यालयात दाखल झाले होते. पुन्हा चौकशीला बोलवल्यास सहकार्य करणार असल्याचे इक्बालसिंह चहल यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.

16:17 January 16

वाळूज येथे प्लास्टिक कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाचे सहा गाड्या दाखल

औरंगाबाद - जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी भाषण आग लागल्याचे पाहायला मिळाले. वाळूज औद्योगिक वसाहतीतील जोगेश्वरी येथील सोहेल प्लास्टिक कंपनी या चटईच्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या दुर्घटनास्थळी पोहोचल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असून कंपनीच्या शेजारी अनेक घरे देखील आहेत. ही आग पसरू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत असल्याचं अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितल.

16:00 January 16

पोटच्या मुलांना विष देऊन निर्दयी बापाची आत्महत्या, मुलीचा मृत्यू तर मुलावर उपचार सुरू

नागपूर - शहरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वैष्णवदेवी नगर एका निर्दयी बापाने स्वतःच्या मुलांना जेवणातून विष देऊन हत्या केल्यानंतर स्वतः सुद्धा आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अशोक बेले (४५) असे आरोपीचे नाव आहे तर प्रिन्स (१२) आणि तनिष्का (०७) असे मुलांची नावं असून या घटनेत तनिष्काचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर प्रिन्सवर उपचार सुरू आहेत.

15:58 January 16

BMC च्या कामात भ्रष्टाचार, प्रशासकांच्या मागील बोलवता धनी कोण? आदित्य ठाकरेंचा गंभीर सवाल

मुंबई -: शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे आमदार व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी १३ जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या नावाखाली ६००० कोटी रुपयांचा मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला. आदित्य यांच्या आरोपांनंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून एक प्रसिद्धी पत्रक काढण्यात आलं. मात्र, त्यात 13 तारखेच्या पत्रकार परिषदेतील कोणत्याही प्रश्नाला उत्तर नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. याच विषयावर त्यांनी दादर येथील शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली.

15:32 January 16

सत्यजित तांबेंचे युवक काँग्रेस अध्यक्ष पद घेणार काढून

मुंबई - नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत सुधीर तांबे यांनी माघार घेत मुलगा सत्यजित तांबे आने अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेसमध्ये केलेल्या या बंडखोरीने वरिष्ठ स्तरावर तांबे विरोधात मोठी नाराजी पसरली आहे. पक्षांतर्गत केलेल्या कारवायामुळे तांबेंवर निलंबनाची कारवाई तर सत्यजित तांबे यांच्याकडील युवक अध्यक्ष पद काढून घेण्यात येणार आहे.

15:17 January 16

दोन मुलांच्या जेवणात विष मिसळून बापानेच केली हत्या

नागपूर - पत्नीसोबत झालेल्या वादातून एका व्यक्तीने आपल्या दोन निरागस मुलांच्या जेवणात विष मिसळून त्याची हत्या केली. त्यानंतर आरोपीने गळफास लावून आत्महत्या केली. नागपूर शहरातील वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत वैष्णवदेवी नगरात ही घटना घडली आहे.

14:12 January 16

आदित्य ठाकरेंकडून मुंबई मनपाच्या निविदावर प्रश्न उपस्थित

मुंबई महापालिकेने रस्त्याची कंत्राटे रद्द करावी लागणार आहेत. निविदा रद्द करण्याऐवजी पालिकेने पत्रक काढून चुकीची माहिती दिली आहे.

14:11 January 16

200 पयांच्या बनावट नोटा चित्रकार हनीफ शेखकडून जप्त

मुंबई - चित्रकार हनीफ शेख याला मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 200 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. 60,000 रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या जप्त केलेल्या नोटा तपासासाठी पाठवण्यात आल्या आहेत.

14:02 January 16

200 रुपयांच्या बनावट नोटा चित्रकार हनीफ शेखकडून जप्त

33 वर्षीय चित्रकार हनीफ शेख याला मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 200 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. 60,000 रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या जप्त केलेल्या नोटा तपासासाठी पाठवण्यात आल्या असून पुढील तपास सुरू आहे.

14:01 January 16

बच्चू कडू यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर राहण्यापासून सूट

आमदार बच्चू कडू आज देखील मुंबई सत्र न्यायालयात हजर राहणार नाहीत. मंत्रालयातील सरकारी अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी त्यांच्यावर खटला सुरू आहे.

14:00 January 16

अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील नॉट रिचेबल

अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील नॉट रिचेबल झाल्या आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाने पाटील यांना पाठिंबा दिला होता. महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून त्यांची जाहीर घोषणा केली होती. मात्र दोन दिवसातच शुभांगी पाटील नॉटरीचेबल झाल्या आहेत. त्यामुळे तर्क वितर्क लावले जात आहेत

13:15 January 16

शहरातील जुने सिव्हिल हॉस्पिटल आवारात खोदकाम करतेवेळी मानवी शरीराचे हाडे सापडल्याने खळबळ

धुळे शहरातील साक्री रोडवर असलेल्या जुने सिव्हील हॉस्पिटलच्या आवारात अज्ञात मानवी शरीराचे हाडे आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे एक पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.

13:03 January 16

शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील नॉट रिचेबल

मुंबई - अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील नॉट रिचेबल झाल्या आहेत. शिवसेनेने पाटील यांना पाठिंबा दिला होता. महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून त्यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. मात्र दोन दिवसातच शुभांगी पाटील नॉटरीचेबल झाल्या आहेत. त्यामुळे तर्क वितर्क लावले जात आहेत.

12:43 January 16

घाऊक महागाईदर पाच टक्क्याच्या आत

नवी दिल्ली - अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित वार्षिक चलनवाढीचा दर डिसेंबर 2022 मध्ये 4.95% पर्यंत घसरला आहे. यापूर्वी हा दर 5.85% होता. नोव्हेंबर 2022 मध्ये हा महागाईदर नोंदवला गेला अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने दिली.

11:59 January 16

अनिल देशमुख नियमित हजेरीसाठी ईडी कार्यालयात

मुंबई -माजी गृहमंत्री अनिल देशमुख हजेरी देण्यासाठी ईडी कार्यालयात आले आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामिनावर सुटकेच्यावेळी त्यांना दर सोमवारी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांना हजेरी लावावी लागते.

11:49 January 16

कथित कोविड केंद्रांच्या चौकशीसाठी BMC आयुक्त इक्बाल सिंग चहल ईडी कार्यालयात

मुंबई - कथित कोविड केंद्रांच्या घोटाळ्याच्या संदर्भात चौकशीसाठी BMC आयुक्त इक्बाल सिंग चहल मुंबईतील ईडी कार्यालयात आले आहेत. त्यांची आज यासंदर्भात चौकशी होणार आहे.

11:07 January 16

नक्षलवाद्यांचा पोलिसांच्या पथकावर गोळीबार, पोलिसांच्या प्रत्युत्तरानंतर २० ते २५ नक्षलवाद्यांनी काढला पळ

गडचिरोलीतील अहेरी तालुक्यातील वेदमपल्ली वनपरिक्षेत्रात नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला. पोलिसांनीदेखील प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. त्यानंतर 20-25 नक्षलवादी जंगलात पळाले, पोलिसांनी घटनास्थळावरून शस्त्रे आणि नक्षल साहित्य जप्त केले आहेत, असे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.

10:46 January 16

छोटा राजनचा साथीदार निलेश पराडकरला मुंबई पोलिसांकडून अटक

शिवसेनेचा पदाधिकारी आणि छोटा राजनचा साथीदार निलेश पराडकर उर्फ शटल्या उर्फ आप्पा याला मुंबई पोलिसांनी केली अटक

10:46 January 16

जूननंतर मंदी येण्याची शक्यता-नारायण राणे

ही वस्तुस्थिती आहे की सध्या विविध विकसित देशांना मंदीचा सामना करावा लागत आहे. जूननंतर मंदी येण्याची शक्यता आहे. मंदीचा फटका देशातील नागरिकांना बसू नये यासाठी केंद्र आणि पंतप्रधान मोदी प्रयत्नशील आहेत, असल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जी २० च्या पुण्यातील बैठकीत सांगितले.

10:17 January 16

युपीप्रमाणे मुंबईत प्रेते तंरगली नाहीत... इक्बाल चहल यांच्या ईडी चौकशीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला

नाकासमोर गेलेले प्रकल्प आधी आणा, दावोसमधून काय मिळेल माहित नाही, असा टोला खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांची ईडी चौकशी करणार आहे. त्यावरूनही राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. खासदार राऊत म्हणाले, की युपीप्रमाणे मुंबईत प्रेते तंरगली नाहीत. अत्यंत पारदर्शक व्यवहार होते.

09:20 January 16

सुजीत वर्मा टोळीचा पंटर राजकिरणला पुणे गुन्हे शाखेने केली अटक

सुजीत वर्मा टोळीचा पंटर राजकिरण उर्फ ओमस्या गणेश भंडारी याला गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाकडून मेढा सातारा येथून अटक केली आहे. पुणे शहरात आगामी होत असलेली अंतराष्ट्रीय जी-२० परीषद, त्याच प्रमाणे प्रजासस्ताक दिना निमीत्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता पुणे शहर पोलिसांकडून शहरभर कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

08:57 January 16

मीटर रिकॅलिब्रेशन नसलेल्या रिक्षा, टॅक्सीवर दंडात्मक कारवाई होणार

मुंबईसह एमएमआर रिजनमधील रिक्षा, टॅक्सीच्या मीटर रिकॅलिब्रेशन करण्यासाठी १५ जानेवारी पर्यंत मुदतवाढ दिली होती. ही मुदतवाढ दिल्यानंतरही केवळ ५० टक्के रिक्षा आणि टॅक्सीचे मीटर रिकॅलिब्रेशन करण्यात आले आहेत. यामुळे आता रिकॅलिब्रेशन न करणाऱ्या रिक्षा टॅक्सीवर दिवसाला ५० रुपये तर जास्तीत जास्त ५ हजार रुपयांचा दंड करण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाने सांगितले आहे

07:53 January 16

G-20 इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुपची पहिली बैठक 16 व 17 जानेवारीला पुण्यात होणार

G20 इंडिया प्रेसिडेंसी अंतर्गत G-20 इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुपची पहिली बैठक 16 व 17 जानेवारीला पुण्यात होणार आहे. हे सदस्य देश, अतिथी देश आणि भारतीय G20 अध्यक्षांच्या अंतर्गत 2023 च्या पायाभूत सुविधा अजेंडावर चर्चा करण्यासाठी भारताने आमंत्रित केलेल्या आंतरराष्ट्रीय संघटनांना एकत्र आणणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

07:39 January 16

दावोसला जाण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीचे घेतले दर्शन

ठाणे : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2023' या क्रिकेट स्पर्धेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवला. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या विनंतीला मान देत क्रिकेटच्या मैदानात जोरदार बॅटिंग केली. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने स्वित्झर्लंड येथील दावोस येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी रवाना झाले. तिथे जाण्यापूर्वी त्यांनी स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांचे समाधीस्थान असलेल्या शक्तीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले

07:30 January 16

मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल आज ईडी कार्यालयात लावणार हजेरी

मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल हे आज ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत. मुंबई महापालिकेतील घोटाळ्यासंदर्भात त्यांना ईडीने यापूर्वीच समन्स बजाविले आहे.

07:20 January 16

पतंगबाजीमुळे अहमदाबादमध्ये १६००हून अधिक पक्षी जखमी

अहमदाबादच्या चॅरिटेबल ट्रस्टकडे 1 ते 15 जानेवारी दरम्यान पतंगाच्या तारांमुळे जखमी झालेले 1,600 हून अधिक पक्षी आणले गेले. पतंगबाजी ही पक्ष्यांच्या जीवाशी येत असल्याचे दिसून येत आहे.

07:19 January 16

नर व मादी कुत्र्यांचा विवाह, कुत्र्यांच्या मेजवानीसाठी ५० हजार खर्च

मकरसंक्रातीला उत्तर प्रदेशमध्ये नर व मादी कुत्र्यांचा विवाह लावून देण्यात आला. कुत्र्याच्या मालकाने परिसरातील कुत्र्यांना मेजवानी देण्यासाठी सुमारे 40,000-45,000 रुपये खर्च केले आहे.

07:16 January 16

नोकरीच्या आमिषाने फसवणूक होणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

ओडिशा पोलिसांनी देशातील सर्वात मोठ्या नोकऱ्यांमधील फसवणुकीचा रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यामधील आरोपी हे अलीगढमधील अभियंते आहेत. त्यांनी सरकारी वेबसाईटप्रमाणे दिसणाऱ्या 9 वेबसाइट्स विकसित केल्या आहेत.

07:15 January 16

केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी चौबे यांच्या वाहन ताफ्याचा अपघात, अनेक पोलीस जखमी

केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी चौबे यांच्या ताफ्यातील एस्कॉर्ट वाहनाचा रविवारी अपघात झाला. या अपघातात अनेक पोलीस जखमी झाले. केंद्रीय मंत्री बक्सरहून पाटण्याला जात असताना हा अपघात झाला.

07:13 January 16

नेपाळच्या विमान दुर्घटनेत सर्व प्रवासी ठार, नेपाळ पंतप्रधानांनी बोलाविली आपत्कालीन बैठक

नेपाळच्या विमान दुर्घटनेत अपघातस्थळावरून कोणीही जिवंत वाचले नाही. नेपाळच्या पंतप्रधानांनी विमान अपघातानंतर मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक बोलावली. आज सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू होणार आहे.

06:43 January 16

Breaking News : एनटीसी मिलच्या जमिनीवरील 11 जुन्या चाळींचा टप्प्याटप्प्याने विकास करणार-पियूष गोयल

मुंबई:केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी रविवारी महाराष्ट्र सरकार (जीओएम), मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण यांची रविवारी बैठक घेतली. एनटीसी मिलच्या जमिनीवरील 11 जुन्या चाळींचा टप्प्याटप्प्याने विकास करणार असल्याचे यावेळी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी सांगितले.

Last Updated : Jan 16, 2023, 9:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details