महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे अद्याप हस्तांतरित नाही - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक

मुंबई पोलीस खात्यातील क्राईम ब्रँचचे अधिकारी सचिन वाझें यांना अटक करण्यात आली. मात्र, एटीएसकडून सुरू असलेल्या मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास अद्यापही राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळालेला नसल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने मंगळवारी विशेष न्यायालयामध्ये दिली.

हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे अद्याप हस्तांतरित नाही
हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे अद्याप हस्तांतरित नाही

By

Published : Mar 24, 2021, 7:50 AM IST

मुंबई- मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पियो गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात गृह खात्याकडून राष्ट्रीय तपास यंत्रणेला चौकशीचे आदेश देण्यात आले. त्यानंतर या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी केली जात असताना, मुंबई पोलीस खात्यातील क्राईम ब्रँचचे अधिकारी सचिन वाझें यांना अटक करण्यात आली. मात्र, एटीएसकडून सुरू असलेल्या मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास अद्यापही राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळालेला नसल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने मंगळवारी विशेष न्यायालयामध्ये दिली.

अँटिलिया इमारतीच्या बाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीच्या संदर्भातील एकमेव साक्षीदार हिरेन मनसुख यांचा मृत्यू झाल्यानंतर यासंदर्भात एटीएसकडून तपास केला जात होता. हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात आल्यानंतर या संदर्भातील कागदपत्रे व इतर गोष्टी अजूनही राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना हस्तांतरित करण्यात आलेले नाहीत. याबाबत एनआयएने विशेष न्यायालयात माहिती दिली मध्ये मंगळवारी दिली आहे.

एटीएसला यश-

दरम्यान, एटीएस कडून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या तपासात 2 जणांना अटक केली आहे. तसेच एक व्हॉल्वो गाडीसुद्धा हस्तगत केलेली आहे. याप्रकरणी विनायक शिंदे या पोलीस कर्मचाऱ्याला सुद्धा अटक केलेली आहे. 2007 च्या लखनभैय्या एन्काउंटर प्रकरणी त्यास जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details