महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Monsoon Session 2023: विधानसभेचे पावसाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता, 'या' मुद्द्यांसह महत्त्वाच्या विधेयकांवर होणार चर्चा - Bills Supplementary Demands

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन 4 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे.

Assembly Monsoon session 2023
पावसाळी अधिवेशन

By

Published : Jul 17, 2023, 9:04 AM IST

Updated : Jul 17, 2023, 9:57 AM IST

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. दोन आठवड्याच्या अधिवेशनात पहिल्याच दिवसभराच्या कामकाजात राज्य शासनाने अध्यादेश, तारांकित प्रश्न, विधेयक, पुरवणी मागण्या पटलावर ठेवल्या आहेत. विरोधकांनी मात्र, या सर्व मुद्द्यांवरून बहुसंख्य असलेल्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणण्याची रणनीती आखली आहे. आजचा दिवस त्यामुळे विधिमंडळात वादळी असणार आहे. या अधिवेशनात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.


विरोधकांची फळी डळमळीत :मागील वर्षीच्या अधिवेशनात शिवसेनेत फूट पडल्यानंतर यंदा राष्ट्रवादी पक्षात दोन गट झाले आहेत. अधिविशेच्या तोंडावर तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह 35 आमदारांनी शिंदे गट - भाजपच्या सरकारला पाठिंबा दिला. त्यामुळे विरोधकांची फळी डळमळीत झाली आहे. सत्ताधाऱ्यांकडे जवळपास 210 आमदारांचे संख्याबळ आहे. विरोधात सर्वपक्षीय 70 आमदार आहेत. अशा स्थितीत विधिमंडळात मुख्यमंत्र्यांच्या सोबतीला प्रथमच दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत.


अधिवेशनातील महत्वाचे मुद्दे :राज्य शासनाने सर्व घडामोडींवर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्या दिवशी 2023 चे महाराष्ट्र सहकारी संस्था दोन आणि पाचचे सुधारित दोन अध्यादेश, महाराष्ट्र ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सुधारित अध्यादेश, वैद्यता प्रमाणपत्राला मुदत वाढ, महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणुकीच्या अध्यादेश, 2023-2024 या आर्थिक वर्षाच्या पुरवणी मागण्या, विधानसभा व विधान परिषदेच्या विधेयकांना राष्ट्रपती व राज्यपालांनी दिलेली संमती जाहीर करणे, तालिका अध्यक्ष नेमणे आणि 2024 चे महाराष्ट्र सहकारी संस्था, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद - पंचायत समितीचे सुधारित विधेयक, विधानसभा विधेयक क्रमांक 20 चे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन-नगररचना सुधारणा, 2023 च्या विधानसभा विधेयक क्रमांक 21 चे झोपडपट्टी निर्मूलन आणि पुनर्विकासाचे विधेयक पटलावर ठेवण्यात येणार आहे. विधेयक, अध्यादेश आणि पुरवणी मागण्यांवर साधकबाधक चर्चा करून मंजुरीसाठी पाठवले जाणार आहे. विरोधक यावर कोणते मुद्दे सभागृह समोर मांडतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.


शोक प्रस्ताव :दिवंगत खासदार गिरीश बापट, खासदार बाळू धानोरकर, खासदार शंकरराव वाकुळणीकर, बाबुराव वाघमारे, रामचंद्र अवसरे या आजी माजी विधानसभा विधान परिषदेच्या सदस्यांच्या निधनामुळे शोक व्यक्त केला जाणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे काम यानंतर संस्थगित होईल. विरोधक सरकारला कोणत्या मुद्द्यावरुन घेरणार, सरकारकडून काय उत्तरे देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Last Updated : Jul 17, 2023, 9:57 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details