मुंबई - मुंबईतील महालक्षमी रेसकोर्स परिसरात सोमवारी एका भरधाव मर्सेडीज कारने रस्त्यावरील पादचारी राजेंद्र कुमार लोचनराग (वय ४३) यांना चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी मुंबईतील प्रसिद्ध हिरे व्यापारी ललित अदानी यांचा मुलगा चैतन्य अदानी यास अटक केली आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ हजारांच्या जामिनावर सुटका केली आहे.
महालक्ष्मी कार अपघात; आरोपी चैत्यन्य अदानी यास जामीन - Adani
मुंबईतील महालक्षमी रेसकोर्स परिसरात सोमवारी एका भरधाव मर्सेडीज कारने रस्त्यावरील पादचारी राजेंद्र कुमार लोचनराग (वय ४३) यांना चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्या आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ हजारांच्या जामिनावर सुटका केली आहे.
सोमवारी (ता.३) चैतन्य अदानी हा त्याच्या (एमएच-02-सीबी-0333) क्रमांकाच्या मर्सेडीज कारने हाजीआली सिग्नल येथून महालक्ष्मी जवळ येत होता. या वेळी चैतन्य हा भरधाव वेगात एका कारला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न करत होता. यावेळी त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार महालक्ष्मी रेसकोर्सची भिंत तोडून रस्त्यावरून जाणाऱ्या राजेंद्र कुमार लोचनराग यांना चिरडत पुढे गेली. यात राजेंद्र यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी कलम 304 (अ), 427 नुसार गुन्हा नोंदविला आहे.