महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फटाके बंदीचा प्रस्ताव बारगळला? मात्र फटाकेमुक्त दिवाळीसाठी जनतेला आवाहन - कोरोनाचा धोका टळला नाही

दिवाळीतील फटाके बंदीचा प्रस्ताव बारगळल्याची परिस्थिती सध्या दिसून येत आहे. मंत्रिमंडळ बैठकीत अद्याप यावर कोणताही ठोस निर्णय झाला नाही. मात्र, कोरोनाचा धोका पाहता फटाके फोडू नये याबाबत जनतेने विचार करणे गरजेचे असल्याचे मत आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे.

फटाके बंदीचा प्रस्ताव बारगळला?
फटाके बंदीचा प्रस्ताव बारगळला?

By

Published : Nov 5, 2020, 9:05 PM IST


मुंबई- दिवाळी सण काही दिवसांवर आला आहे. मात्र, या काळात फटाके वाजवू नये, फटाके आणि त्याच्या धुरामुळे श्वसनाला त्रास होतो. त्यामुळे असंख्य नागरिकांना याचे परिणाम भोगावे लागतील. या दृष्टीने दक्षता घेत नागरिकांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी करावी, असा प्रस्ताव आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणला होता. मात्र तो बारगळल्याचे चित्र दिसून येत आहे. असे असले तरीही यंदाची दिवाळी ही फटाकेमुक्त करण्यासाठी जनतेला आवाहन करण्यात येईल, असे मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरले असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर टोपे यांनी याविषयीची माहिती दिली.

टोपे म्हणाले की, मी सकाळी टास्क फोर्स आणि इतर डेथ ऑडिटच्या संबंधित तज्ज्ञांची बैठक घेतली. त्या बैठकीतही दिवाळीत फटाके फोडण्यावर बंदी घातली जावी, असा विषय तज्ज्ञाकडून मांडला गेला होता. यामुळे दिवाळीत वाजविण्यात येणारे फटाके आणि त्याचा धूर यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात श्वसनाला त्रास होतो. म्हणून त्यावर बंदी घातली असे नाही केले तर त्याचे परिणाम होतील, असा इशारा टोपे यांनी दिला.

फटाके बंदीचा प्रस्ताव बारगळला?
युरोपातील देशांमध्ये कोरोनाची संख्या वाढतेय-

युरोपीय देशातील जर्मनी, स्पेन, फ्रान्स, युके आदी देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्या ठिकाणी पाच ते दहा पटीने कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे, आपल्याकडे यावेळी राज्यातील जनतेने फटाके मुक्त दिवाळी साजरी करावी. राज्यातील नागरिक याला प्रतिसाद देतील. यामुळेच आम्ही आवाहन जनतेला फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी जनतेला सरकारच्या वतीने आवाहन करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेतला असल्याचेही टोपे म्हणाले. तसेच या बैठकीत पर्यावरण पूरक फटाके वाजवले तर चालतील का या विषयावर देखील चर्चा झाली असल्याचे टोपे म्हणाले.

दिल्ली, पश्चिम बंगालप्रमाणे निर्णय हवा-

कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन देशात दिल्ली आणि पश्चिम बंगाल येथे फटाके यावर दिवाळीत बंदी घालण्याचा निर्णय घेतला. आपल्याही राज्यात अशी बंदी घातली जावी, असे मत आपण मांडले आणि त्याच पार्श्वभूमीवर माझ्या म्हणण्याला बैठकीत प्रतिसाद मिळाला. त्यामुळे सर्वांच्या आरोग्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. यासाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरे करण्याचे आवाहन केले जाणार असल्याचे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details