महाराष्ट्र

maharashtra

महा अर्थसंकल्प २०२१-२२ : पर्यावरण आणि पर्यटनासाठी मोठी तरतूद

By

Published : Mar 8, 2021, 3:36 PM IST

Updated : Mar 8, 2021, 5:29 PM IST

२०२१-२०२२ या आर्थिक वर्षासाठी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पर्यावरण आणि पर्यटन क्षेत्रांतील विविध योजनांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे.

Maha Budget 2021-22
महा अर्थसंकल्प २०२१-२२

मुंबई -आज विधानसभेत राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. २०२१-२०२२ या आर्थिक वर्षासाठी हा अर्थसंकल्प आहे. कोविड महामारीसह अनेक संकटांशी झगडत असलेल्या राज्य सरकार आणि राज्यातील जनतेसाठी हा अर्थसंकल्प अतिशय महत्त्वाचा होता. यामध्ये पर्यावरण आणि पर्यटन क्षेत्रांतील विविध योजनांसाठी तरतूद करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पाचे वाचन करताना अजित पवार

पर्यटन आणि पर्यावरणवृद्धसाठी विविध प्रकल्प -

येत्या आर्थिक वर्षात पर्यावरण संवर्धनासाठी 'माझी वसुंधरा' हा विशेष कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. नागरिकांना पर्यावरणातील बदलांबाबत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जागरुक केले जाणार आहेत. विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नागपूरमध्ये गोंडवना थीम पार्क आणि सफारी सुरू केली जाणार आहे. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सिंह आणि व्याघ्र सफारीची पुनरर्चना करण्यात येणार आहे. हवाई-बीज पेरणी तंत्राच्या सहाय्याने वनक्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. समृद्धी महामार्गांच्या दोन्ही बाजूने वृक्षलागवडीसाठी योजना राबवली जाणार आहे. यासाठी वन विभागाला १ हजार तर, पर्यावरण बदल विभागासाठी २४६ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

पर्यावरण आणि पर्यटनासाठी भरीव तरतूद करण्यात आली

तीर्थक्षेत्रांच्या विकासाठी भरीव तरतूद -

परळी वैजनाथ, औंढा नागनाथ, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर या ज्योर्तिलिंगांच्या विकासासाठी निधीची घोषणा करण्यात आली. जेजूरी, बीरदेव या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी आवश्यक तो निधी दिला जाणार आहे. मोझरी आणि कौंडीण्यपूर येथील देवस्थानांना विकासासाठी निधीची घोषणा करण्यात आली. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या संप्तश्रृंगी गडाला विशेष विकास निधी देण्यात आला आहे. सर्व अष्टविनायकांना निधी देण्यात आला. मंगळवेढा येथे संत बसवेश्वर यांच्या स्मरणार्थ स्मारक बांधण्यासाठी निधीची घोषणा करण्यात आली. बंजारा समाजाचे आद्यगुरू सेवालाल महाराजांची समाधी असलेल्या पोहरादेवी या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधीची घोषणा करण्यात आली.

Last Updated : Mar 8, 2021, 5:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details