महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आढावा:राज्यात तिसऱ्या टप्प्यासाठी 14 मतदारसंघांत मंगळवारी मतदान - 14

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत राज्यात २४९ उमेदवार रिंगणात असून यामध्ये १९ महिला उमेदवारांचा समावेश आहे. बारामती मतदार संघात सर्वाधिक ४ महिला उमेदवार आहेत. तर पुणे व माढा मतदारसंघात सर्वाधिक प्रत्येकी ३१ उमेदवार रिंगणात असून सर्वात कमी ९ उमेदवार हे सातारा मतदारसंघात आहेत.

राज्यात तिसऱ्या टप्प्यासाठी 14 मतदारसंघांत मंगळवारी मतदान

By

Published : Apr 21, 2019, 9:39 PM IST

मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील १४ मतदार संघामध्ये मतदान होणार असून २४९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात २ कोटी ५७ लाख ८९ हजार ७३८ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज असून जास्तीत जास्त मतदारांनी आपला हक्क बजावावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत राज्यात २४९ उमेदवार रिंगणात असून यामध्ये १९ महिला उमेदवारांचा समावेश आहे. बारामती मतदार संघात सर्वाधिक ४ महिला उमेदवार आहेत. तर पुणे व माढा मतदारसंघात सर्वाधिक प्रत्येकी ३१ उमेदवार रिंगणात असून सर्वात कमी ९ उमेदवार हे सातारा मतदारसंघात आहेत.

  • तिसऱ्या टप्प्यातील मतदारसंघनिहाय उमेदवारांची संख्या
मतदारसंघ

उमेदवारांची संख्या

  • जळगाव
१४
  • रावेर
१२
  • जालना
२०
  • औरंगाबाद
२३
  • रायगड
१६
  • बारामती
१८
  • सातारा
  • अहमदनगर
१९
  • सांगली
१२
  • रत्नागिरी-सिंधुदुर्ग
१२
  • कोल्हापूर
१५
  • हातकणंगले
१७
  • पुणे
३१
  • माढा
३१



या प्रक्रियेत ५६ हजार २५ बॅलेट युनिट तर ३५ हजार ५६२ कंट्रोल युनिट देण्यात आली आहेत. तसेच ३७ हजार ५२४ व्हीव्हीपॅट यंत्रे सुद्धा या १४ मतदार संघात देण्यात आली आहेत. या टप्यातील प्रक्रियेसाठी एकूण १ लाख ४१ हजार ११३ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसंच १७ हजार १९२ कर्मचाऱ्यांना राखीव म्हणून ठेवण्यात आले आहे. तिसऱ्या टप्प्यात एकूण १ कोटी ३३ लाख १९ हजार १० पुरुष तर १ कोटी २४ लाख ७० हजार ७६ महिला आणि ६५२ इतर नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

  • तिसऱ्या टप्प्यातील मतदार संघ, जिल्हानिहाय मतदान केंद्रे आणि एकूण मतदारांची संख्या
  • मतदारसंघ
मतदान केंद्रे एकूण मतदारांची संख्या
  • जळगाव
२०१३ १९ लाख २५ हजार 352
  • रावेर
१९०६ १७ लाख ७३ हजार १०७
  • जालना
२०५८ १८ लाख ६५ हजार २०
  • औरंगाबाद
२०२१ १८ लाख ८४ हजार ८६५
  • रायगड
२१७९ १६ लाख ५१ हजार ५६०
  • पुणे
१९९७ २० लाख ७४ हजार ८६१
  • बारामती
२३७२ २१ लाख १२ हजार ४०८
  • अहमदनगर
२०३० १८ लाख ५४ हजार 248
  • माढा
२०२५ १९ लाख ४ हजार 845
  • सांगली
१८४८ १८ लाख ३ हजार 53
  • सातारा
२२९६ १८ लाख ३८ हजार 987
  • रत्नागिरी-सिंधुदुर्ग
१९४२ १४ लाख ५४ हजार 524
  • कोल्हापूर
२१४८ १८ लाख ७४ हजार 345
  • हातकणंगले
१८५६ १७ लाख ७२ हजार 563


निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, उन्हापासून बचावासाठी सावलीची व्यवस्था, प्रत्येक विधानसभा मतदान केंद्रात सखी मतदान केंद्र, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे 10 टक्के मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे लाइव्ह वेबकास्ट केले जाणार असून जिल्हा निवडणूक अधिकारी, राज्यस्तरावर मुख्य निवडणूक अधिकारी आणि भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी, संबंधित मतदार संघांचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक हे लाइव्ह वेबकास्ट पाहतील. मतदान करण्यासाठी मतदाराचे नाव मतदार यादीत असणे गरजेचे आहे. त्याशिवाय मतदान करता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या ओळखपत्राशिवाय अन्य अकरा प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येईल, असेही शिंदे यांनी सांगितले.

  • मतदानासाठी आवश्यक 11 दस्तावेज
पासपोर्ट (पारपत्र)
  • वाहन चालक परवाना
  • छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र

(राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम,सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र)

  • छायाचित्र असलेले बँकांचे पासबूक
  • पॅनकार्ड
  • राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी

(नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरअंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड)

  • मनरेगा कार्यपत्रिका
  • कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड
  • छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज
  • खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र
  • आधारकार्ड

ABOUT THE AUTHOR

...view details