मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रत्येक उमेदवाराने जास्तीत जास्त मतदारांच्या गाठी भेटी घेण्यावर भर दिला. मोटारसायकलवरुन प्रचार करण्यास उमेदवारांनी पसंती दिली.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मोटारसायकल रॅली काढण्यावर उमेदवारांचा भर - dina patil
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रत्येक उमेदवाराने जास्तीत जास्त मतदारांच्या गाठी भेटी घेण्यावर भर दिला.
ईशान्य मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील यांनी वेगात प्रचार करीत ईशान्य मुंबई पिंजून काढली. दीना पाटील यांनी नाहूर रेल्वे स्थानक पूर्व, विक्रोळी पूर्व घाटकोपर, रमाबाई नगर, गोवंडी, मानखुर्द येथे धावता प्रचार केला. यावेळी संजय पाटील यांनी जास्तीत जास्त मतदार भेटीवर भर दिला.
कार्यकर्ते मोटारसायकल वरूण मोठ्याने घोषणा देत परिसर उमेदवाराचा प्रचार करीत पुढे जात होते. १७ व्या लोकसभेचा चौथ्या टप्प्यातील प्रचार शनिवारी शेवटच्या दिवशी पूर्ण झाला.