मुंबई - महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना राबवताना दिसत आहे. मात्र लॉकडाऊन असल्यामुळे दररोज सेकंदाप्रमाणे धावपळ मुंबईतील चाकरमान्यांना घरी कसे थांबायचे हा प्रश्न सतावत आहे. 31 मार्चपर्यत असलेले लॉकडाऊन सुद्धा १४ एप्रिलपर्यत वाढले आहे. एकीकडे हातावर पोट असलेला इतर भाषिक मजदूर सुद्धा दुसऱ्या जिल्ह्यात जाताना दिसत असताना त्यात मुंबईचा चाकरमानी सुद्धा पाठीमागे नाही आहे त्यांची घालमेल झाल्याचे पाहायला मिळत आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी
LOCK-DOWN : मुंबईतील चाकरमान्यांची गावी जाण्यासाठी घालमेल.. विशेष वृत्तांत - maigrant people
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना राबवताना दिसत आहे. मात्र लॉकडाऊन असल्यामुळे दररोज सेकंदाप्रमाणे धावपळ मुंबईतील चाकरमान्यांना घरी कसे थांबायचे हा प्रश्न सतावत आहे.
त्यात चाकरमानी हाच मार्ग अबलवतना दिसत आहे. फक्त चालत नाही आमदार आणि खासदारांकडे आम्हाला गावी जायची परवानगी द्या असे लेटर घेण्यासाठीही गर्दी होत आहे. आमदारांनी व खासदारांनी या चाकरमान्यांना गावी येण्यासाठी परवानगी द्यावी व तशी गाड्यांची व्यवस्था करावी अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी कोणी कुठे जाण्याची आवश्यकता नाही असे सांगितले, जिथे आहात तिथे सुरक्षित रहा काळजी करू नका असं सर्वाना सांगितले आहे. यामुळे आता घाबरलेले चाकरमनी चालत तर चालत आपल्या आपल्या गावी जातायेत.