जून महिन्याच्या मध्यापर्यंत दडी मारलेल्या पावसाने जोरदार कमबॅक केले आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसाचा कहर पहायला मिळत आहे. मुंबई व उपनागरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
- मुंबईतील मालाडमध्ये संरक्षक भिंत कोसळून २० जणांचा मृत्यू
मुंबई- पश्चिम उपनगरातील मालाड येथे भिंत कोसळून २० जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री मुसळधार पाऊस सुरू असताना ही दुर्घटना घडल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दुर्घटनेत मोठ्या संख्येने रहिवाशी जखमी झाल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. वाचासविस्तर
- सीएसएमटी-कुर्ला ठप्प, कुर्ला-अंबरनाथ पहिली लोकल धावली
मुंबई - गेल्या चार दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाने मुंबईची अक्षरशः तुंबई केली आहे. याचा परिणाम उपनगरीय रेल्वेवर झाला आहे. सीएसटी-ठाणे आणि सीएसटी-वाशीपर्यंतची लोकल सेवा पुर्णतः ठप्प झाली आहे. सायन-माटुंगा-कुर्लादरम्यान ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने पुढील सुचना मिळेपर्यंत या मार्गावर एकही लोकल धावणार नसल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. तसेच शासनाकडून मुंबईत आठवडाभरासाठी हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. वाचा सविस्तर
- घातवार :मुंबई-पुण्यात भिंत, नाशकात टाकी कोसळली; ३० जणांचा मृत्यू
मुंबई- राज्यात मंगळवार नागरिकांसाठी घातवार ठरला. मुंबईतील मालाड भागात भिंत कोसळून १८ जण ठार झाले. तर, कल्याणमध्ये भिंत कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला. शनिवारीच पुण्यातल्या कोंढवा भागात भिंत कोसळून १५ मजुरांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुण्यात पुन्हा एकदा भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. आंबेगांव सिंहगड येथील कँम्पसमध्ये सिमाभिंत कोसळली आहे. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच नाशकात निर्माणाधीन पाण्याची टाकी कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला तर, २ जखमी झाले आहेत. वाचा सविस्तर
नागोठण्यात अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली; तर रोह्यात कोसळली दरड
रायगड - जिल्ह्यात रात्री पासून काही भागात पावसाने उसंत घेतली असली तरी नागोठणे, रोहा, सुधागड पाली, महाड, श्रीवर्धन या दक्षिण भागात पाऊस रात्रभर पडत होता. नागोठणेमधील अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पाणी बाजरात घुसले आहे. तर पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाचा सविस्तर
मुंबई विमानतळावर विमान घसरले; ५४ विमानांचे मार्ग वळवले, ५२ उड्डाणे रद्द