मुंबई -आज संसदेत मोदी सरकार - २ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत आहे. या अर्थसंकल्पात मुंबईत महिलांसाठी स्पेशल रेल्वे गाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी महिला प्रवासी संघटनेच्या वंदना सोनावणे यांनी केली. महिलांचा प्रथम श्रेणीचा डबा फारच अरुंद असून, तो महिला प्रवाशांची संख्या पाहता मोठा करण्यात यावा. पैसे भरूनही या डब्यातून अनेक महिलांना उभे राहून प्रवास करावा लागतो. तसेच महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणीही सोनावणे यांनी केली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प: 'मुंबईत महिलांसाठी स्पेशल रेल्वे गाड्यांची संख्या वाढवावी' - women demand
आज संसदेत मोदी सरकार - २ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत आहे. या अर्थसंकल्पात मुंबईत महिलांसाठी स्पेशल रेल्वे गाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी महिला प्रवासी संघटनेच्या वंदना सोनावणे यांनी केली. महिलांचा प्रथम श्रेणीचा डबा फारच अरुंद असून, तो महिला प्रवाशांची संख्या पाहता मोठा करण्यात यावा.
'मुंबईत महिलांसाठी स्पेशल रेल्वे गाड्यांची संख्या वाढववी'
मध्य रेल्वेचा एकूणच भोंगळ कारभार पाहायला मिळतो. पश्चिम रेल्वेत महिलांच्या डब्यात लावण्यात आलेली टॉकबॅक प्रणाली अद्याप बसविण्यात आली नाही, ती लावण्यात यावी. नवीन गाड्या सेवेत आणा पण त्या आणण्यापूर्वी सिग्नल यंत्रणा अद्यावत करावी. सर्व यंत्रणा स्थानिक पातळीवर आणा. ज्यांच्या मतांवर तुम्ही निवडून आलात, सर्वांत जास्त महसूल मुंबईकडून मिळतो. मात्र, मुंबईच्या वाटेला सुविधा अद्याप तुटपुंज्या येतात.