- 7.00 PM वर्धा -शहर आणि लगतच्या वेगवेगळ्या भागात जोरदार विजांच्या कडकडाटसह पाऊस. वायफड येथे शेतात वीज पडून मोबाईलसह शर्ट जळाले. सुदैवाने यावेळी दोघे जण बचावले.
- 6.07 PMसांगली - मुसळधार पाऊसाला सांगलीत सुरुवात
- 5.25 PM ठाणे -डोंबिवलीत रिक्षाचालकाचं अपरहण करुन जीवघेणी मारहाण, भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह 5 ते 6 जणांविरोधात गुन्हा दाखल; आरोपी फरार
- 5.16 PM जळगावातपावसामुळे मातीच्या घराचे छत कोसळून 6 जण दबले; तिघांची प्रकृती गंभीर
- 4.31 PM औरंगाबाद - स्थूल असल्यामुळे भावंड टिंगल करतात तरुणाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न. देवदूत बनून आलेल्या विशेष पोलीस अधिकऱ्यांनी वेळीच धाव घेतल्याने 19 वर्षीय तरुणाचा जीव वाचला. अतुल शिवाजी बोन्द्रे, असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
- 4.02 PM गोंदिया - अखिल भारतीय किसान काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र काँग्रेशचे निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख नाना पटोले यांचा गोंदियात गौप्यस्फोट. निवडणुका जाहीर होताच भाजपचे विद्यमान कॅबिनेट आणि राज्य मंत्री तसेच भाजप नेते काँग्रेसमध्ये येणार.
- 3.48 PM मुंबई - आगीत धुरामुळे घुसमटून मृत्यू
- 3.37 PM मुंबई -कर्नाटकच्या बंडखोर आमदाराचा नवा व्हिडीओ व्हायरल; कोणत्याही दबावाखाली किंवा पैश्यासाठी आम्ही राजीनामा दिला नाही आहे. स्वाभिमान जपण्यासाठी दिला राजिनामा. उद्या बहुमतचाचणीत उपस्थित राहणार नसल्याचा केला पुनउच्चार.
- 3.36 PM शिर्डी -साईबाबा संस्थानला 1 कोटीचे दान; आंध्रप्रदेश येथील एका अज्ञात भाविकाने दिले 1 कोटीचे साई संस्थानला दान.
- 3.00 PM - माणसा, माणसा कधी होशील रे माणूस? नाल्यात फेकलेल्या ‘नकोशी’ला कुत्र्यांनी वाचवले
- चंदीगड -हरियाणाच्या कैथल आणखी एका 'नकोशा कळी'च्या जिवावर उठलेल्या नातेवाईकांनी प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून नाल्यात फेकून दिले होते. मात्र, रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांनी ही प्लॅस्टिक पिशवी बाहेर ओढून काढत चिमुकल्या बाळाला जीवदान दिले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सध्या ही मुलगी रुग्णालयात असून तिची प्रकृती गंभीर आहे. तिला वाचवण्याचे सर्व प्रयत्न सुरू असून प्रकृती सुधारल्यानंतर तिला बालसंरक्षण अधिकाऱ्यांकडे सोपवले जाणार आहे. वाचा सविस्तर
- 2.30 PM - एअर इंडियामधील बढत्यासह नव्या नियुक्त्या थांबवा ; केंद्र सरकारचे आदेश
- नवी दिल्ली- केंद्र सरकार एअर इंडियाचे खासगीकरण करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एअर इंडियामधील मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बढत्या व नियुक्त्या थांबविण्याचे आदेश दिले आहेत. वाचा सविस्तर
- 2.15 PM - सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा, रोहिणी भाजीभाकरे जगाला सांगणार भारताची निवडणूक प्रक्रिया
- सोलापूर - तामिळनाडुतील सेलम येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेली सोलापूरची लेक रोहिणी भाजीभाकरे-बिदरी यांनी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. भारताची निवडणूक प्रकिया जगाला सांगण्यासाठी भारतातून २ जिल्हाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये रोहिणी भाजीभाकरेंचा समावेश आहे. त्यांचा हा सन्मान म्हणजे सोलापूर जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे. वाचा सविस्तर
- 2.00 PM - वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, ३ नव्या चेहऱ्यांना संधी
- मुंबई -बीसीसीआयने आज (रविवार) वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. विंडीजविरुद्ध 3 ते 8 ऑगस्ट या कालावधीत टी-20 मालिका होईल. त्यानंतर 8 ते 14 ऑगस्ट या कालावधीत तीन एकदिवसीय सामने आणि 22 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेसाठी विराटलाच कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. वाचा सविस्तर
- वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. खलील अहमद, नवदीप सहानी, वॉशिंग्टन सुंदर या ३ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
- 1.25 PM -भारत-पाक सीमेलगतच्या ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी बंकर्सचे बांधकाम सुरू
- श्रीनगर - भारत-पाकिस्तान सीमेलगतच्या गावांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी सरकारने बंकर्स बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सीमेजवळच्या १८९२ गावांमध्ये बंकर्स बांधण्यात येणार आहेत. सीमेवर दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरू झाला असताना बंकर्समध्ये लपल्यामुळे नागरिकांचे संरक्षण होऊ शकणार आहे. वाचा सविस्तर
- 1:18 PM मुंबई :मुंबई : कुलाबा येथील ताज हॉटेल जवळील चर्चिल चेंबर इमारतीला आग, एकाचा मृत्यू
- मुंबई -कुलाबा येथील ताज हॉटेल जवळील चर्चिल चेंबर इमारतीला आग लागली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. वाचा सविस्तर
- 12.20 PM - थरारक..! चंद्रपुरात बिबट्या थेट शिरला घरात, वनविभागाने केली सुटका
- चंद्रपूर- भक्षाच्या शोधात असलेला एक बिबट्या थेट घरात घुसल्याची घटना बल्लारपूर तालुक्यातील इटोली या गावात घडली. या घटनेने ग्रामस्थांची चांगलीच भंबेरी उडाली होती. त्यानतंर वन विभागाच्या प्रयत्नांनी या बिबट्याला जंगलाच्या दिशेने पळवून लावण्यात यश आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाचा सविस्तर
- 12.00 AM - औरंगाबाद - पुराच्या पाण्यात दुचाकीसह दोन वनरक्षक गेले वाहून
- राहुल जाधव आणि अजय भोई अशी वाहून गेलेल्या वनरक्षकांची नावे आहेत. कन्नड येथील भारंबा तांडा येथील घटन घडली. दोघेही कन्नड येथील जैतखेडा येथे कार्यरत होते. यापैकी राहुल जाधव यांचा मृतदेह आणि दुचाकी नादीपात्रात आढळला आहे. महसूल आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून, बेपत्ता वनरक्षक अजय भोई यांना शोधण्याचे काम सुरू आहे.
- 11.30 AM - स्कूटरपासून बनवले पेरणी यंत्र, झारखंडमधील शेतकऱ्याची किमया
- हजारीबाग - गरीब अल्पभूधारक शेतकऱ्यांना सतावणारी सगळ्यात मोठी समस्या म्हणजे संसाधनांची कमतरता. मशागत, बी- बीयाणे, खते याचा खर्च गरीब शेतकऱ्याचे पुरते कंबरडे मोडतो. मात्र, झारखंड राज्यातील एका शेतकऱ्याने या सर्व अडचणींवर रडत न बसता उत्तर शोधले आहे. शेतीची मशागत ट्रक्टर किंवा बैलांनी करणे परवडत नसल्याने या शेतकऱ्याने चक्क मशागत करण्याचे यंत्रच बनवले. वाचा सविस्तर
- 11.10 AM - चांद्रयान-२ च्या उड्डाणाची तयारी पूर्ण, इतिहास घडवण्यासाठी भारत पुन्हा सज्ज
- नवी दिल्ली - भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) देशाच्या महत्वकांक्षी चांद्रयान-२ च्या उड्डाणाची पूर्व चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. भारत पुन्हा एकदा इतिहास घडविण्यासाठी सज्ज झाला आहे. सोमवारी २२ जुलैला चंद्रयान - २ चे उड्डाण होणार आहे. वाचा सविस्तर
- 11.00 AM - मैत्रिणीच्या होणाऱ्या नवऱ्याला अश्लील मेसेज पाठवायचा, न्यायालयाने लावला समुद्रकिनारा स्वच्छ करायला..
- मुंबई- उच्च न्यायालयात न्यायमूर्ती रणजित मोरे व न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने एका आरोपीला गुन्ह्यातून सुटका करीत आगळी वेगळी शिक्षा सुनावली आहे. या तरुणाला शिक्षा म्हणून महिनाभर आठवड्यातून दोन दिवस वर्सोवा समुद्र किनारा स्वच्छ करावयाचा आहे. वाचा सविस्तर
- 10.30 -रायगडमधील खालापूरमध्ये गावठी आळंबी खाल्ल्याने पाच जणांना विषबाधा
- 10.00 AM -रत्नागिरीत ४५ लाखांचे कोकेण जप्त, ३ जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
- 9.30 AM - पक्षाने निष्ठावान, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व गमावले - प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात
- मुंबई - दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री व केरळच्या माजी राज्यपाल शीला दीक्षित यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक अत्यंत अनुभवी, निष्ठावान व सुसंस्कृत नेतृत्व गमावले आहे, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. वाचा सविस्तर
- 9.20 AM -बायकोला जास्त वेळ दिल्याने टीम इंडियातील खेळाडू संकटात!
- नवी दिल्ली -विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर टीम इंडियाच्या गोटात तणावाचे वातावरण आहे. एकीकडे कर्णधार कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्वचिन्ह उपस्थित होत आहेत तर दुसरीकडे धोनीच्या निवृत्तीबाबत चर्चांना उधाण आले आहे. अशातच, भारतीय संघातील खेळाडूंना अजून एका कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर
- 9.00 AM- झारखंडमध्ये ४ जणांची बेदम मारहाण करून हत्या
- गुमला - झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील ओझा-गुणी परिसरात ४ जणांची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. सिसई पोलीस ठाणे परिसरात सकारी गावात काठ्या-दांडक्यांनी मारून-मारून ४ लोकांना ठार करण्यात आले. चेहरा झाकलेल्या ८ ते १० जणांनी ही मारहाण केल्याचे सांगण्यात आले. वाचा सविस्तर
- 8.30 AM - गुवाहटी - आसाममध्ये जपानी तापाचे १०२ बळी
- गुवाहटी- आसाममध्ये जपानी तापामुळे (मेंदूज्वर) आत्तापर्यंत १०२ जणांचा बळी गेला आहे. आसाम मेडीकल कॉलेजचे प्रमुख हिरण्य कुमार गोस्वामी यांनी याबाबतची माहिती दिली. वाचा सविस्तर
- 8 AM - नवी दिल्ली- दिल्ली भाजपचे माजी अध्यक्ष मांगे राम गर्ग यांचे सकाळी ७.३० वाजता निधन
- 7.30 AM - नवी दिल्ली -दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यावर आज (रविवार) बोध घाटावर होणार अंत्यसंस्कार
- 07.15 AM कोलकाता -सोनभद्र भेटीप्रकरणी ममता बॅनर्जींकडून प्रियांका गांधींचे समर्थन
- कोलकाता - तृणमूल काँग्रेसच्या शिष्ठमंडळाला उत्तरप्रदेशातील सोनभद्रला जाण्यापासून रोखल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप सरकारवर टिका केली. त्या म्हणाल्या की, पश्चिम बंगालच्या भाटपाडा येथे हिंसाचार झाला तेव्हा भाजपच्या शिष्ठमंडळाने तातडीने त्या ठिकाणी भेट दिली. मात्र, आता भाजपची सत्ता असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये तृणमूलच्या शिष्ठमंडळाला सोनभद्र हत्याकांडातील पीडितांना भेटायला जाण्यापासून रोखले जात आहे. भाजपने कायद्याचे पालन केले पाहिजे असेही त्या म्हणाल्या. तसेच त्यांनी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे समर्थन सोनभद्रला जाऊन त्यांनी काही चूक केली नसल्याचे त्यांनी सांगितले.वाचा सविस्तर...
- 7.00 AM - 'ढिंग' एक्सप्रेस सुसाट.. हिमा दासने महिन्यात जिंकली 5 सुवर्णपदके
- नोवे मेस्टो(चेक प्रजासत्ताक)-भारताची वेगवान धावपटू हिमा दास हिने सुवर्णपदक जिंकण्याचा सपाटा लावला आहे. तिने शनिवारी चेक प्रजासत्ताक येथील नोवे मेस्टो नाड मेटुजी ग्रां प्री स्पर्धेत 400 मीटर अंतर 52.09 सेंकदमध्ये पार करत सुवर्णपदक जिंकले आहे. हिमाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली. हिमा दासने मागील पंधरा दिवसात विविध स्पर्धात पाच सुवर्णपदके जिंकली आहेत. वाचा सविस्तर
आज..आत्ता... वर्धा अन् सांगलीत पावसाची जोरदार बॅटींग - WATER
झरझर नजर... दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या वाचा एका क्लिकवर...
आज... आत्ता...
Last Updated : Jul 21, 2019, 7:31 PM IST