मुंबई : मुंबईकरांचे पर्यटन स्थळ असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ( Sanjay Gandhi National Park ) लवकरच सिंहाची डरकाळी ऐकायला मिळणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस गुजरातमधून सिंहाची जोडी आणणार असल्याची माहिती, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार ( Forest Minister Sudhir Mungantiwar ) यांनी दिली.
Sanjay Gandhi National Park : लवकरच नॅशनल पार्कमध्ये सिंहाची डरकाळी; नोव्हेंबरच्या अखेरीस आणणार सिंहाची जोडी - नॅशनल पार्कात सिंहाची डरकाळी
मुंबईकरांचे पर्यटन स्थळ असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ( Sanjay Gandhi National Park ) लवकरच सिंहाची डरकाळी ऐकायला मिळणार आहे. लवकरच गुजरातमधील सक्कर प्राणी संग्रहालयातील (Sukar Zoo Museum) सिंह नॅशनल पार्कात आणण्याबाबत सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत.
लवकरच सक्कर प्राणी संग्रहालयातील सिंह नॅशनल पार्कमध्ये : बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात १२ हेक्टर कुंपण क्षेत्रात 1975-1976 मध्ये सिंह सफारी सुरू करण्यात आली होती. सिंह सफारी मुळे उद्यानाच्या महसुलात वाढ झाली होती. परंतु केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने सिंहाचे प्रजनन करण्यास मनाई केल्याने येथील सिंहाची संख्या कमी झाली. गेल्या महिन्यात १७ वर्षे वयाच्या सिंहाचा मृत्यू झाल्याने उद्यानात एकच नर सिंह शिल्लक राहिला आहे. मात्र, लवकरच गुजरातमधील सक्कर प्राणी संग्रहालयातील ( Sukar Zoo Museum ) सिंह नॅशनल पार्कमध्ये आणण्याबाबत सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत.
सिंहाची जोडी मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात : राज्याचे वन मंत्री मुनगंटीवार २६ सप्टेंबर रोजी गुजरात दौऱ्यावर गेले होते. गुजरातचे वन राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांच्याशी सिंह राज्यात आणण्याबाबत चर्चा करण्यात आली. गुजरातमधील सिंहाची जोडी मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठविण्याबाबत एकमत झाले होते. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या परवानगीसाठी हा विषय थांबला होता. आता ही परवानगी मिळाल्याने गुजरात येथील सक्करबाग प्राणी संग्रहालयातील आशियाई सिंहाची जोडी आता नोव्हेंबर अखेरीस मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती, मंत्री मुनगंटीवार यांनी दिली.