मुंबई - शहरात टॅक्सीचालक आणि प्रवाशांमधील सतत होणारे वाद टाळण्यासाठी परिवहन विभागाने टॅक्सीवर दिवे लावण्याचा तोडगा काढला आहे. हे दिवे टॅक्सीची व्यस्तता दर्शवतील. ज्यामुळे टॅक्सी प्रवासाठी उपलब्ध आहे की नाही, हे प्रवशांना टॅक्सी थांबवण्याआधीच कळणार आहे.
ही पद्धत बाहेरील देशांमध्ये आगोदरच वापरली जाते. आपल्याकडे यापूर्वी टॅक्सीच्या बोनेटवर साधे मीटर होते. हे मीटर अप असल्यास टॅक्सी प्रवाशांसाठी उपलब्ध आहे; तर टॅक्सीचा मीटर डाऊन असल्यावर टॅक्सीत प्रवासी आहेत, अशी माहिती मिळत होती. मात्र, कालांतराने शहरातील सर्व टॅक्सींमध्ये इलेक्ट्रॉनिक मीटर लावण्यात आले. हे मीटर टॅक्सीच्या आतमध्ये बसवल्याने बाहेरील प्रवाशाला टॅक्सीची उपलब्धता कळत नाही. याचाच गैरफायदा घेत काही टॅक्सी चालक सर्रासपण भाडे नाकारत होते. दिवे बसवल्याने याला आळा बसेल. भारतात प्रथमच हा प्रयोग मुंबईत केला जाणार आहे. सर्व टॅक्सी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, टॅक्सीवर बसवण्यात येणारे दिवे प्रशासनाच्या खर्चातून बसवले जावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा -पारंपारिक टॅक्सी व्यवसायिकांचा 'गोवा माईल्स' विरोधात संप; मुख्यमंत्र्यांचे चर्चेसाठी आवाहन