मुंबई - चौथ्या टप्प्यातील निवडणुकीला अवघे ४ दिवस शिल्लक आहेत. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर व काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांच्यात पत्र वॉर रंगले आहे. निरुपम यांनी दिलेल्या आव्हानाला कीर्तिकर यांनी लिहिलेले पत्र नुकतेच वायरल झाले आहे.
आखाडा लोकसभेचा : कीर्तिकर-निरुपम यांच्यात रंगले लेटर 'वॉर'
पत्रात कीर्तीकर यांनी केलेल्या ५ वर्षांतील कामांची यादीचा अहवाल देण्यात आला आहे. तसेच मी माझ्या मतदारसंघातील मतदारांना उत्तर देण्यास बांधील आहे.
काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांनी कीर्तिकर यांना पत्र लिहून गेल्या ५ वर्षांत केलेल्या कामाची खुलेआम चर्चा करण्यासाठी आव्हान दिले होते. त्यानंतर गोरेगावात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या जाहीर सभेतही निरुपम यांच्यावर सडकून टीका केली होती. तर कीर्तिकर यांनी आता निरुपम यांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रात कीर्तीकर यांनी केलेल्या ५ वर्षांतील कामांची यादीचा अहवाल देण्यात आला आहे. तसेच मी माझ्या मतदारसंघातील मतदारांना उत्तर देण्यास बांधील आहे, असे कीर्तिकर यांनी म्हटले आहे.
सर्जिकल स्ट्राईकचे पुरावा मागणाऱ्या तुम्हाला जनता विसरली नाही. जे सैनिकांच आदर करत नाही ते कोणाच आदर करू शकत नाही, असेही निरुपम यांना सुनावले आहे.