मुंबई- तब्बल चौदा हजार कोटींचा घोटाळा करुन पंजाब नॅशनल बँकेला चुना लावणाऱ्या व देशातून पळून गेलेल्या नीरव मोदी याच्याविरोधात सीबीआयकडून विशेष न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जाद्वारे नीरव मोदी त्याचा भाऊ निशाल मोदी यांच्या कंपनीचा एक्झिक्युटिव्ह सुभाष परब या तिघांच्या संपत्तीच्या जप्तीचे आदेश द्यावेत, अशी विनंती सीबीआयकडून गुरुवारी विशेष न्यायालयाला करण्यात आली.
नीरव मोदीच्या संपत्तीवर टाच आणण्याची सीबीआयची मागणी - subhash parabh
नीरव मोदी सध्या लंडनमध्ये आहे. त्याला भारतात आणण्याची कायदेशीर कारवाई केंद्राकडून सध्या सुरू आहे. मात्र, नीरव मोदीचा भाऊ निशाल मोदी व त्याच्या कंपनीचा एक्झिक्युटिव्ह सुभाष परब हे देशाबाहेर पळून गेलेले आहेत.
नीरव मोदी
नीरव मोदी सध्या लंडनमध्ये आहे. त्याला भारतात आणण्याची कायदेशीर कारवाई केंद्राकडून सध्या सुरू आहे. मात्र, नीरव मोदीचा भाऊ निशाल मोदी व त्यांच्या कंपनीचा एक्झिक्युटिव्ह सुभाष परब हे देशाबाहेर पळून गेले आहेत. त्यामुळे त्यांना फरार आरोपी घोषित करत त्यांच्या संपत्तीवर टांच आणावी व तशा प्रकारचे आदेश न्यायालयाने द्यावे, अशी मागणी सीबीआयतर्फे विशेष न्यायालयात करण्यात आली आहे.