मुंबई -अंधेरी मरोळ परिसरातील विजय नगर येथील वुडलँड इमारतीत बिबट्या शिरल्याची घटना घडली आहे. इमारती खाली उभ्या असलेल्या एका चारचाकी वाहनाखाली बिबट्या झोपलेल्या अवस्थेत आढळून आला. आज सकाळी ९.३० वाजता ही घटना उघडकीस आली. ठाणे वनविभागाचे पथक व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे इमारतीत दाखल झाले आहेत.
अंधेरीच्या मरोळमध्ये निवासी इमारतीत आढळला बिबट्या - वनविभाग
अंधेरी मरोळ परिसरातील विजय नगर येथील वुडलँड इमारतीच्याखाली बिबट्या आढळून आला आहे. येथील उभ्या असलेल्या एका चारचाकीच्या खाली बिबट्या झोपलेल्या अवस्थेत आढळून आला.
अंधेरी मरोळ परिसरातील विजय नगर येथील वुडलँड इमारतीच्याखाली बिबट्या आढळून आला आहे.
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे अधिकारी आटोकाट प्रयत्न करत असून दोन पिंजरे देखील लावण्यात आले आहेत. या इमारतीतील रहिवाशांनी भीतीने घरातच थांबणे पसंत केले आहे, तर बिबटयाला बघण्यासाठी बघ्यांनीदेखील गर्दी केली आहे. आरेपासून अवघ्या १०० मीटर परिसरात ही इमारत आहे.
Last Updated : Apr 1, 2019, 4:35 PM IST