मुंबई- गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे शहरातील लोकांचे हाल होत आहे. या पावसामुळे चाकरमान्यांना ये-जा करण्यास त्रास होत आहे. तर विक्रोळी स्थानकात छत गळत असल्याने त्यातून मोठ्या धारा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
मुसळधार पावसाचे पुनरागमन; विक्रोळी स्थानकात छत गळत असल्याने प्रवासी त्रस्त - people facing problems
सकाळपासूनच संततधार सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील लोकांचे हाल होत आहे. पावसामुळे विक्रोळी रेल्वे स्थानकाला गळती लागली आहे.
पावसाने सकाळी ८ च्या दरम्यान जोर धरला होता. त्यामुळे चाकरमाण्यांचे हाल झाले आहे. काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या भीतीत भर पडली आहे. पावसामुळे शहरात भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनांमध्ये मोठी जीवितहानी झाली. आता या घटनांची पुनरावृत्ती तर होणार नाही ना, याची मुंबईकरांना धास्ती भरली आहे. संततधार पावसामुळे रेल्वे तब्बल १४ तास ठप्प होती. तर विक्रोळी रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक ४ वर छतामधून पाणी गळत आहे. छतामधून मोठी धार खाली येत असल्याने प्रवाशांच्या अडचणीत भर पडली आहे.