महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज.. आत्ता.. काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांचे आर्टिकल ३७० हटवण्याला समर्थन - breaking news etv

झरझर नजर... दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाच एका क्लिकवर...

आज आत्ता

By

Published : Aug 6, 2019, 8:49 AM IST

Updated : Aug 6, 2019, 8:04 PM IST

7.40 मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांचे आर्टिकल ३७० हटवण्याला समर्थन.

7.20 जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक लोकसभेत मंजूर

1:40 - अकोला - पुराच्या पाण्यात केळीचे दोन ट्रॅक्टर ट्रॉली गेले वाहून; 13 जणांचे वाचले प्राण

1:12 - ठाणे पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या विविध भ्रष्टाचारी विकास प्रस्तावांना स्थगिती

ठाणे- स्वाभिमान संघटनेने केलेल्या आंदोलनानंतर ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या विविध भ्रष्टाचारी विकास प्रस्तावांना स्थगिती देण्यात आली आहे. भ्रष्ट लोकप्रतिनीधीच्या विकास प्रस्तावाच्या नावाखाली होणाऱया भ्रष्टचाराची चौकशी ईडी (ED)मार्फत झालीच पाहिजे, असा टोला स्वाभिमान संघटनेचे ठाणे शहर अध्यक्ष विजय ञिपाठी यांनी लगावला. तसेच महापालिकेच्या मुख्यालयासमोर निर्दशने केली.

12:26 - बकरी ईद प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; दुपारी 3 वाजता निर्णय

मुंबई- बकरी ईद प्रकरणी प्राण्यांचा बळी देताना स्वच्छतेची काळजी घेण्यात यावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर आज दुपारी 3 वाजता निर्णय होणार आहे.

ज्या सोसायटीत कुर्बाणीसाठी जागा व महानगरपालिकेची परवानगी असेल अशा ठिकाणी कुर्बाणी दिली जाऊ शकते. या बरोबरच महानगरपालिकेकडून परवानगी देण्यात आलेल्या 54 ठिकाणी कुर्बाणी दिली जाऊ शकते.

या प्रकरणी अंतीम निर्णय दुपारी 3 वाजता उच्च न्यायालय देणार आहे.

11:55 - पुण्यात सापांचा धुडगूस; खडकवासलामधून नदीत पाणी सोडल्याने साप आले बाहेर

पुणे- खडकवासला धरणातून मुठा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या नदीच्या काठावरील बिळात राहणारे साप आणि इतर सरपटणारे प्राणी मानवी वस्तीत शिरकाव करत आहेत. पुण्यातील धायरी, नांदेडसिटी, शिवणे, सिंहगडरोड परिसरात मोठ्या प्रमाणात साप घुसले आहेत. या सापांना नागरिकांकडून इजा होऊ नये यासाठी सर्पमित्र आप्पा दुर्बल यांनी या सापांना पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडले आहे.

11.40 - राज्यातील पूरस्थितीवर सरकार लक्ष ठेवून; केंद्र सरकारही करणार मदत - मुख्यमंत्री फडणवीस

यवतमाळ- जिलह्यात एनडीआरएफच्या 2 टीम तैनात केल्या आहेत. तसेच लष्कराचे 80 जवान लोकांना सुरक्षित स्थळी नेत असून आतापर्यंत 1500 कुटूंबाना बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच सांगलीत एनडीआरएफची 1 टीम पोहचली असून आणखी एक टीमसाठी प्रयत्न चालू आहेत.त्या भागाचा आढावा चंद्रकांत पाटील घेत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोल्हापुरात आलेल्या पूरस्थितीबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयूरप्पा यांच्याशी बोललो आहे. अलमट्टी धरणातून विसर्ग थोडा कमी करण्याची विनंतीही त्यांना केली आहे. त्यांनीही कोयनेचा विसर्ग कमी करण्याबाबत आपल्याला पत्र लिहिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. केंद्र सरकारने सर्वोत्तपरी मदतीचे आश्वासन दिले असून पूर परिस्थितीवर उद्या सकाळी आढावा बैठक घेणार असल्याचे ते म्हणाले.

11:39 वर्ध्याच्या हिंगणघाट येथे महिलेवर दारू विक्रेत्यांचा प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी

वर्धा- येथील हिंगणघाट येथे महिलेवर दारू विक्रेत्यांनी प्राणघातक हल्ला केला आहे. हिंगणघाट येथील डांगरनगरात ही घटना घडली आहे. पूजा काळे असे त्या महिलेचे नाव असून त्या दारूबंदी महिला मंडळाची अध्यक्ष आहेत.

या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांना सेवाग्राम रुगणालायत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

11:44 पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त; भरपाई देण्याची मागणी

धुळे- पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई मिळण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले आहे.

11:41 फुणगूस थुळवाडीतल्या जमिनीच्या भेगा वाढल्या

रत्नागिरी- येथील फुणगूस थुळवाडीतल्या जमिनीच्या भेगा वाढल्या आहेत. भेगांमुळे झाड कोसळून घराची पडवी जमिनदोस्त झाली आहे.

11.30 - नाना पटोलेना मी गंभीरतेने घेत नाही - मुख्यमंत्री

यवतमाळ - नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. एका बाजूला राज्यात अस्मानी आणि दुष्काळी संकट तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री महाजनादेश यात्रा करत असल्याची टीका नाना पटोले यांनी केली होती. त्यावर नाना पटोलेना मी गंभीरतेने घेत नसल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

11:20 - खऱ्या अर्थाने आता जम्मू- काश्मीर भारताचे अंग - मुख्यमंत्री

यवतमाळ - आता खऱ्या अर्थाने जम्मू - काश्मीर हे भारताचे अंग असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच त्यांनी या धाडसी निर्णयासाठी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन केले आहे. विकासापासून वंचीत असलेल्या या भागात विकासाचे दालन आता सुरु होईल, असेही ते म्हणाले.

LIVE UPDATE -

  • काश्मीरप्रश्नी जीव देण्याचीही तयारी - अमित शाह
  • कलम 370 रद्द करण्यावर लोकसभेत चर्चा सुरू
  • कलम 370 रद्द करण्याचे विधेयक लोकसभेत मांडले; चर्चा सुरू

10.28 - मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्ववत

रायगड - पावसामुळे पडलेले झा़ड रस्त्यावरुन बाजूला हटवण्यात आले आहे. पोलादपूर येथे कोसळले होते झाड. त्यामुळे मुंबई - गोवा महामार्ग ठप्प झाला होता. आता या महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे.

08.50 - राधानगरी धरणाच्या वीज निर्मिती केंद्रात मोठा स्फोट

कोल्हापूर - राधानगरी धरणाचे अतिरिक्त आपत्कालीन दरवाजे (emergency gate) उघडल्यामुळे पात्रात पाणी पडताच ते उफाळून वीज निर्मिती केंद्रात घुसले. त्यामुळे राधानगरी धरणाच्या वीज निर्मिती केंद्रात मोठा स्फोट झाला आहे. यामुळे वीज निर्मिती ठप्प झाली आहे. या ठिकाणच्या महापारेषणच्या ११० केव्हीचे अतिउच्चदाब उपकेंद्रांमध्ये कंबरेपर्यंत पाणी आल्यामुळे उपकेंद्रातून निघणाऱ्या सर्व वाहिन्याही बंद पडल्या आहेत. दुसऱ्या मार्गाने वीज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

08.30 - कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

कोल्हापूर - शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यातील 107 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीची पाणीपातळी 51 फूट 6 इंच इतकी आहे. याचा फटका कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला देखील बसला आहे. कार्यालय परिसरात पाणीच पाणी साचले आहे. तसेच जिल्ह्यातील धरणक्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरु आहे. रात्रीपासून राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. पुण्याहून कोल्हापूर, बेळगाव, बंगळुरुकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

08.24 - राजापूरातील अर्जुना आणि कोदावली नदीला पूर

रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावरील अर्जुना नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अर्जुना आणि कोदावली नदीला पूर आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. राजापूर बाजारपेठेत पुराचा पाणी शिरले.

दिल्लीमध्ये झाकिर नगर भागात इमारतीला आग, ६ मृत्यूमुखी, ११ जखमी

काँग्रेस-राष्ट्रवादीचे ५० पेक्षा अधिक आमदार आमच्या संपर्कात; गिरीश महाजन यांचा दावा

जळगाव- आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील ८३ पैकी १५ ते २० आमदार आपल्या पक्षांमध्ये राहायला तयार नाहीत. सद्यास्थितीत या दोन्ही पक्षातील तब्बल ५० पेक्षा अधिक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'महाजनादेश' यात्रा ७ ऑगस्टला जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सविस्तर वाचा...

Last Updated : Aug 6, 2019, 8:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details