- 11.30 PM - मुंबई - गोवा महामार्गावर दरड कोसळली, दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प
- 6:30 PM पुणे -तिहेरी तलाक बिलच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूलनिवासी मुस्लीम मंचच्या वतीने आंदोलन, कायदा रद्द करण्याची आंदोलकांची मागणी.
- 6:13 PM यवतमाळ - महावितरणच्या विरोधात ठिय्या आंदोलन. आर्णी उपविभागीय विजवीतरन कार्यालयातील घटना
- 5:35 PM ठाण्यातील घोडबंदर रोडवर काँग्रेसचे आंदोलन. सर्विस रोड वरील खड्यांमध्ये केले वृक्षारोपण.
- 5:22 PM परभणी - जिल्ह्यात आदित्य ठाकरे यांचा जनआशीर्वाद दौरा आहे. 11.30 वाजता गंगाखेड येथील कार्यक्रमाला येणार होते, पण अजूनही (5.20 pm) ते येथे आलेले नाहीत. 12 वाजल्यापासून त्यांच्या गंगाखेड येथील कार्यक्रम स्थळी शिवसैनिक त्यांची वाट पाहत आहेत.
- 5.05 PM मुंबई -शहरात ३१ जुलैला 27 नंबर बसमध्ये लागलेली आग शॉर्ट सर्किट मुळेच लागली. बेस्ट समितीत अहवाल झाला सादर
- 4.50 -साकीनाका परिसरात घराची भिंत कोसळली, एकाचा मृत्यू
मुंबई - साकीनाका परीसरात घराची भिंत पडल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर एक जण जखमी आहे. चंद्रकांत मुन्नाप्पा शेट्टी (वय.४०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. जखमीवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
4.30 - तिहेरी तलाकचा राज्यातील पहिला गुन्हा ठाण्यात दाखल, नवऱ्याने व्हॉट्सअॅपवर दिला होता तलाक
ठाणे -मुंब्र्यातील एका महीलेने 'मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायदा' अंतर्गत आपल्या पती विरोधात तक्रार दाखल केली आहे. तिच्या पतीने व्हॉट्सअॅपवर 3 वेळा तलाक असे लिहून तिला गेल्यावर्षीच घटस्फोट दिला होता. त्यामुळे या महीलेने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. नव्याने बनवण्यात आलेल्या तिहेरी तलाक कायद्याअंतर्गत पोलिसांनी तिच्या पतीवर गुन्हा दाखल केला आहे.
4.00 - अमरनाथ यात्रा स्थगित, यात्रेवर दहशतवादाचे सावट
जम्मू काश्मीर - जम्मू काश्मीर - राज्याचे महासंचालक दिलबाग सिंह आणि लष्कराच्या चिनार कॉर्पसचे लेफ्टनंट जनरल के. जे. एस धिल्लोन यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी अमरनाथ यात्रेवर दहशतवादाचे सावट असल्याने अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली असून यात्रेकरूना परतण्यास सांगितले आहे.
२.०० राज्यसभेमध्ये बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक विधेयक (युएपीए) मंजूर झाले आहे
१२.४० - धक्कादायक: दारू पिण्यास पैसे न दिल्याने पत्नीची हत्या
अमरावती -दारू पिण्या करता पैसे न दिल्यामुळे दारुड्या पतीनेच आपल्या पत्नीची काठीने मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावती जील्ह्यातील पंढरी या गावात घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.सविस्तर वाचा...
१२.३० - विरोधकांनी ईव्हीएमला दोष देण्यापेक्षा आत्मचिंतन करावे - मुख्यमंत्री फडणवीस
वर्धा - भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आलेली पक्षांतराची भरती मेगा नसून छोटी भरती आहे. ज्यांना जनाधार आहे, त्यांनाच पक्षात घेऊ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. शिवाय विरोधकांनी ईव्हीएमवर शंका घेण्यापेक्षा जनतेमध्ये जावे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला. सविस्तर वाचा...
१२.१५ - मातोश्रीवरुन मला 25 वेळा फोन आला होता, विजय वडेट्टीवारांचा गौप्यस्फोट
नागपूर - पक्षांतर करण्यासाठी मातोश्रीवरुन शिवेसना नेते मिलिंद नार्वेकर यांनी मला किमान 25 वेळा फोन केला होता. आमच्या पक्षात या, मंत्रिपद देऊ, असे प्रलोभन मला दिले होते, असा गौप्यस्फोट विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नागपूर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी वडेट्टीवार यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.सविस्तर वाचा...