महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Lata Mangeshkar Death anniversary : लता मंगेशकर यांची प्रथम पुण्यतिथी, देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन - लता मंगेशकर यांची पुण्यतिथी

भारतरत्न लता मंगेशकर यांचे 6 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी निधन झाले होते. लता मंगेशकर यांच्या भारतीय संगीतातील महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने १९६९ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.आज त्यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त देशभरातून त्यांच्या आठवणींचे स्मरण केले जात आहे.

Lata Mangeshkar Death anniversary
लता मंगेशकर यांची पुण्यतिथी

By

Published : Feb 6, 2023, 7:51 AM IST

मुंबई :भारतरत्न गाण सम्राज्ञी लता मंगेशकर यांची आज ( दि. 6 फेब्रुवारी ) पुण्यतिथी. यानिमित्त सर्वच स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. लता मंगेशकर यांनी त्यांच्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले होते. त्या पार्श्वभूमीवर आज देशभरात अनेक ठिकाणी त्यांच्या स्मरनार्थ अनेक कार्यक्रमांचे आयेजन करण्यात आले आहेत.

लतांजली कार्यक्रमाचे आयोजन :आपल्या आवाजाच्या जादूने प्रत्येक भारतीयाच्या हृदयात अमिट स्थान मिळवलेल्या भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईत एका भव्य संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लतांजली कार्चेयक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मुंबई भाजप अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत आज ( दि. 6 फेब्रुवारी ) रोजी आयोजित करण्यात आला आहे. मेरक इव्हेंट यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम माटुंगा येथे पार पडणार आहे. संध्याकाळी ६.३० वाजता कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

गाण्यातून श्रद्धांजली :अनेक मराठी तसेच हिंदी संगितकार या कार्यक्रमाला हजर राहून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहतील. लता मंगेशकर यांनी गायलेली गाणी उपस्थित कलाकार गातील. यात साधना सरगम, बेला शेंडे, शरयू दाते, संपदा गोस्वामी, निरुपमा डे आणि इतर नामवंत गायकांचा समावेश असणार आहे. त्याशिवाय 50 हून अधिक कलाकार आणि प्रसिद्ध वादक या कार्यक्रमात सहभागी होऊन आपली कला सादर करत लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहतील.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार :लतादीदींनी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार पटकावला आणि इतिहासाच्या पानांमध्ये तिचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले. 1972 मधील 'परिचय' चित्रपट, 1975 मधील 'कोरा कागज' आणि 1990 मधील 'लेकिन' चित्रपटांसह तीन चित्रपटांसाठी तिला हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. 1974 मध्ये, गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्सने लता मंगेशकर यांना इतिहासातील सर्वात रेकॉर्ड केलेल्या कलाकार म्हणून सूचीबद्ध केले आणि असे नमूद केले की त्यांनी 1948 ते 1974 दरम्यान "20 भारतीय भाषांमध्ये 25,000 पेक्षा कमी एकल, युगल आणि कोरस समर्थित गाणी" रेकॉर्ड केली आहेत. त्याच वेळी, त्यांना इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले, जे 2019 पर्यंत चालू राहिले.

राज्य चित्रपट पुरस्कार :1966 मध्ये मनसे आणि 1967 मध्ये जैत रे जैत या चित्रपटासाठी महाराष्ट्र राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार मिळाला. बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन पुरस्कारबंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशनतर्फे 1964 मध्ये वो कौन थी, 1967 मध्ये मिलन, 1968 मध्ये राजा और रंक, 1969 मध्ये सरस्वती चंद्र, 1969 मध्ये सरस्वती चंद्र, 1970 मध्ये दो रास्ता, 1971 मध्ये तेरे मेरे सपने, 1971 मध्ये मार अब्दुलला या सिनेमांसाठी लतादीदींना बेस्ट फिमेल पार्श्वगायिकेचा पुरस्कार देण्यात आला. आणि 1973 मध्ये बॉन पलाशीर पदाबली (बंगाली).

बड्या अभिनेत्रींच्या गाण्याला आवाज :लता मंगेशकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत मोठ्या सिनेमांसाठी गाणी गायली होती. अनेक बड्या अभिनेत्रींच्या गाण्याला आवाज दिला होता. यात हेमा मालिनी, आशा पारेख, मौसमी चॅटर्जी, पद्मिनी कोल्हापुरे, काजोल, राणी मुखर्जी नितू सिंग, रवीना टंडन, रीना रॉय, पूनम धिल्लन यांच्यासह अनेक महिला कलाकारांचा सहभाग आहे. ज्यांच्यासाठी लता मंगेशकर यांनी आपला सुरेल आवाज दिला होता. नरेंद्र मोदी सरकारने लता मंगेशकर यांना 28 सप्टेंबर त्यांची संगीत क्षेत्रात 90 वर्षे पूर्ण झाल्यावर 'डॉटर ऑफ द नेशन' ही उपाधी दिली होती. सन्मानित केले. भारतीय चित्रपट संगीतातील सात दशकांतील योगदानाबद्दल तिला आदरांजली म्हणून ही पदवी प्रदान करण्यात आली.

हेही वाचा :Sidharth Kiara Wedding : कियाराची बालपणीची मैत्रीण ईशा अंबानी जैसलमेरमध्ये दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details