मुंबई - शेतकऱ्यांना गेल्या 5 वर्षात 53 हजार कोटींची थेट मदत केली असल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यामध्ये ११ हजार कोटी केंद्र सरकारने दिले होते. तर ४२ हजार कोटी रुपये राज्य सरकारने आपल्या तिजोरीतून दिले आहेत. प्रत्येक वेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवून चालत नसल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. या सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २५ हजार रुपये देण्याची घोषणा केली मात्र, अद्याप १ रुपयाही दिला नसल्याचे ते म्हणाले.
'गेल्या ५ वर्षात शेतकऱ्यांना ५३ हजार कोटींची मदत'
शेतकऱ्यांना गेल्या 5 वर्षात 53 हजार कोटींची थेट मदत केली असल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यामध्ये ११ हजार कोटी केंद्र सरकारने दिले होते. तर ४२ हजार कोटी रुपये राज्य सरकारने आपल्या तिजोरीतून दिले आहेत. प्रत्येक वेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवून चालत नसल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.
सिंचन सुविधा निर्माण करण्याचे काम केले
गेल्या पाच वर्षात आमच्या सरकारने अनेक महत्वाची कामे केली आहेत. शेती शास्वत करण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. हवामान बदलावर मात करण्यासाठी उपाय हाती घेण्यात आले. जेथे पाणी आहे, तेथे आत्महत्या होत नाहीत. सिंचन सुविधा निर्माण करणे अतिशय महत्वपूर्ण आहे. तेच काम गेल्या 5 वर्षात आपल्या सरकारने केल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. एकात्मिक जल आराखडा 2005 पासून रखडला होता. तो आणच्या सरकारने पूर्ण केला.नदीजोड प्रकल्पांची आखणी केली. हे नवे सरकार निविदा काढेल, अशी माझी अपेक्षा आहे. मराठवाडा वॉटर ग्रीडचे काम हाती घेण्यात आले.